28.2 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home हिंगोली पीक कर्जावरुन बैठकीत गरमागरमी

पीक कर्जावरुन बैठकीत गरमागरमी

एकमत ऑनलाईन

हिंगोली : कोरोनाच्या जैविक संकटामुळे शेतकरी अडचणीत असतांना बँका देखील पीक कर्ज वाटपात आखडता हात घेत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा वेळी शेतक-याच्या तक्रारी वाढत असल्याने आढावा बैठकीत चांगलीच गरमागरमी झाली. पालकमंत्र्यांनी बँकेच्या अधिका-यांना खडेबोल सुनावत पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्ज वाटपात शिथीलता आणण्याचे निर्देश बजावलेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी पीक कर्जा संदर्भात बँक अधिका-यांची आढावा बैठक घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. बैठकीत यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने शेतकरी बांधवांना पिक कर्जाची आवश्यकता आहे. परंतू अद्यापपर्यंत जिल्ह्यातील ७१ टक्के शेतक-यांना पिक कर्जाचे वितरण झालेले नाही. यंदा जिल्ह्यातील बँकांना पिक कर्ज वितरीत करण्यासाठी १ हजार १६९ कोटी उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी ५७ हजार ३४३ शेतक-यांना उद्दिष्टाच्या केवळ ३४० कोटी म्हणजे २९ टक्के पिक कर्ज वितरीत केले आहे अशी माहिती समोर येताच पालकमंत्र्यांनी बँक अधिका-यांना चांगलेच खडेबोल सुनावले.

बँका शेतक-यांना पिक कर्ज वितरणाकरीता टाळा-टाळ करुन दिरंगाई करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यामुळे शेतक-यांना अधिक अडचणीत न आणता सर्व बँकांनी पिक कर्ज वितरणांसाठी गाव व बँक निहाय आराखडा तयार करुन उद्दिष्टानुसार तात्काळ पिक कर्ज वितरण करण्याचे निर्देश पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी दिले.

ऑनलाईन कामकाजात कनेक्टीव्हीटीची अडचण
पीक कर्जवाटप प्रक्रियेसाठी बँकाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. बँक कर्मचारी दररोज जादा तास काम करत आहे. सुट्टीच्या दिवशी देखील बँकेचे अधिकारी, कर्मचारी कामकाज करित आहे. सध्या बँकेचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने केले जात आहे. परंतू कनेक्टीव्हीटीची अडचण येत असल्याचे गा-हाणे बँक व्यवस्थापकांनी मांडले. यावेळी पालकमंत्र्यांनी अडचणीतून मार्ग काढा परंतू पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करा असे बजावले.

महेंद्रसिंग धोनी आणखी किमान दोन वर्षे आयपीएल क्रिकेट खेळू शकेल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या