31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeहिंगोलीगर्दीवर नियंत्रण मिळविण्यात हिंगोली प्रशासनास यश

गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात हिंगोली प्रशासनास यश

एकमत ऑनलाईन

हिंगोली : राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवून गुरूवारपासून निर्बंध लावले आहेत. पहिल्याच दिवशी हिंगोली शहरासह जिल्हाभरातील बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आल्याचे दिसून आले. शहरातील गांधी चौकासह प्रमुख बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट दिसून आला. पोलिसांकडून शहरात येर्णा­यांची कसून चौकशी केली जात होती.

दिवसेंदिवस कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असल्याने राज्य शासनाने १५ ते ३० एप्रिल दरम्यान कडक निर्बंध लावून कोरोनाची साखळी तोडण्याचा चंग बांधला आहे. गुरूवारी सकाळी दूध घेवून येणा-या शेतक-यांना काही काळ सूट देण्यात आली. त्यानंतर विनाकारण शहरात फिरर्णा­यांची पोलिसांसह पालिकेच्या पथकाकडून कसून चौकशी करण्यात येत होती. विनामास्क फिरर्णा­यास दंडही आकारण्यात येत होता. काहींना पोलिसांनी दंडूक्याचा प्रसादही दिल्याने दुपारी १२ नंतर शहरातील गर्दी कमी झाली. केवळ भाजीमंडई सकाळी बीट होतानाच काहीअंशी गर्दी होती. त्यानंतर गर्दी कमी झाली. गुरूवारी शहरातील किराणा दुकान, मेडिकल, ऑप्टीकल, बेकरी, तसेच खते-बियाणांची दुकाने सुरू होती. या दुकानांवरही तुरळक ग्राहक दिसून आली.

औंढा नागनाथ येथे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता बाजारपेठ बंद दिसून आली. वाढत्या कोरोनाच्या पाश्र्­वभूमिवर राज्य शासनाने लावलेल्या कडक संचारबंदीचे औंढ्यात तंतोतंत पालन करण्यात आल्याचे चित्र दिसून आले. दिवसभर मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. अत्यावश्यक सेवेतील दुकाने चालू असलीतरी ग्राहकी मंदावल्याचे चित्र दिसून आले. पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मर्चा­यांनी शहरभर फिरूण विनाकारण फिरर्णा­यांना समज दिली.

लातूर जिल्हयात पूरेशा प्रमाणात रेमडेसीवीर औषध उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या