24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home हिंगोली हिंगोली : बोगस बियाण्याची तपासणी करुन पंचनामे करा -वर्षा गायकवाड

हिंगोली : बोगस बियाण्याची तपासणी करुन पंचनामे करा -वर्षा गायकवाड

एकमत ऑनलाईन

पालकमंत्री वर्षा गायकवाड यांचे जिल्हा कृषी अधीक्षक यांना आदेश

हिंगोली : जिल्ह्यात बोगस बियाण्यासंदर्भात तक्रारी येत असून कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिले आहेत.

जिल्ह्यात अनेक गावातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या संदर्भात पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधून तक्रारीचा आढावा घेतला़. कृषी अधिकाऱ्यांनी ज्या गावातून तक्रारी आल्या आहेत, त्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करावेत.

तसेच शेतकऱ्याने वापरलेले बियाणे कोणत्या कंपनीचे आहे याची तपासणी करुन त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावर खत पोहोचवले जाईल याची काळजी घ्यावी असे सांगून खत टंचाई भासणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याच्याही सूचना पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या.

Read More  चिंगारी : अवघ्या ३ दिवसांत अ‍ॅप ५ लाख युजर्सने केले डाऊनलोड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या