30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeहिंगोलीहिंगोली न.प. कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

हिंगोली न.प. कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

एकमत ऑनलाईन

हिंगोली : कोरोनाच्या काळात धोका पत्कारून सेवा बजावणा-या नगर परिषदेच्या कर्मचा-याचे वेतन थकले आहे. त्याच बरोबर विविध प्रलंबीत न्याय मागण्यांकडेही शासन कानाडोळा करीत आहे. याच्या निषेधार्थ गुरूवारी (दि.१) न.प.कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. शहराच्या ठिकाणी नागरिकांना मुलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यात नगर पालिका प्रशासनाची महत्वपूर्ण भूमिका असते. त्यातंर्गत सेवा बजावणारे स्वच्छता कर्मचारी, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी, कर वसुलीसह इतर विविध विभागातील कर्मचा-यांना मात्र शासनाकडून अत्यावश्यक असलेल्या सुविधा पुरविल्या जात नाहीत.

अगदी वेतनाचा प्रश्नही अनेक वेळा निर्माण होतो. वेळेत वेतन होत नसल्याने कर्मचा-यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच बरोबर अनेक वर्षांपासून प्रलंबीत मागण्याही सोडविण्याकडे वरिष्ठ स्तरावरून कानाडोळा होत आहे. प्रलंबीत मागण्यांसाठी अनेक वेळा आंदोलनेही करण्यात आली. परंतु, त्या मागण्या अजुनही सोडविण्यात आलेल्या नाहीत. परिणामी, नगर पालिका कर्मचा-यात नाराजी पसरली असून, आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात १ एप्रिलला न.प.कर्मचा-यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारून काळ्या फिती लावून कामकाज केले.

यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे, राज्य कार्यकारिणी सदस्य रत्नाकर अडसिरे, जिल्हाध्यक्ष बाळू बांगर, उमेश हेंबाडे, श्याम माळवटकर, कनिष्ठ अभियंता तसनीम सनोबर, प्रिया कोकरे, देविसिंग ठाकूर, गजानन बांगर, गजानन टाले, विजय शिखरे, संजय दोडल, रघूनाथ बांगर, आसोले, शाहीद पठाण, संदिप कांबळे, दिनेश वर्मा, झींगराजी वैरागडे, गजानन आठवले यांच्यासह नगर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, दुस-या टप्प्यात १५ एप्रिलला लेखनीबंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे. तर तिस-या टप्प्यात १ मे पासून अत्यावश्यक सेवेसह कामबंद आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

जिल्ह्यातील संचारबंदी अंशत: शिथील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या