16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeहिंगोलीहिंगोलीवासीयांना व्हॉटस्अपनही भरता येणार कर

हिंगोलीवासीयांना व्हॉटस्अपनही भरता येणार कर

एकमत ऑनलाईन

हिंगोली : हिंगोली पालिकेने आता नागरीकांसाठी आणखी एक सुविधा उपलब्ध केली असून अगदी घरबसल्या पालिकेचा कर व्हॉटस्अपच्या माध्यमातून भरता येणार आहे. त्यासाठी पालिकेने व्हॉटस्अप बेस टॅक्स कलेक्शन सिस्टीम विकसीत केली आहे. त्यामुळे सर्व कर याद्वारे भरता येणार असून विशेष म्हणजे तातडीने कर भरल्याच्या रकमेची ग्राहकाच्या नावे पावती देखील मिळणार आहे.

हिंगोली पालिकेने मागील काही वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. यामध्ये माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ शहर सुंदर शहर, उत्कृष्ठ घरकुल योजना यासह इतर अभियानाचा समावेश आहे. हिंगोली पालिकेची केंद्र शासना सोबतच राज्य शासनानेही दखल घेतली आहे. शहरातील तसेच बाहेरगावी राहणा-या हिंगोलीकरांना पालिकेचा कर भरण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला होता.

त्यासाठी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी व्हॉटस्अप बेस टॅक्स कलेक्शन सिस्टीम विकसीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार याची सर्व कार्यप्रमाणाली तयार करण्यात आली असून त्याचे उदघाटन मंगळवारी ता. ३ सकाळी आकरा वाजता नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, उमेश हेंबाडे, बाळू बांगर, पंडीत मस्के, प्रणव पांडे यांची उपस्थिती होती.

कर भरणा करणे झाले सोपे
हिंगोली शहरात मालमत्ता असलेल्या तसेच नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असलेल्या नागरीकांना व्हॉटस्अपच्या माध्यमातून कर भरता येणार आहे. पालिकेच्या व्हॉटस्अप क्रमांकावर संदेश पाठविल्यानंतर त्या व्यक्तीच्या नांवे शहरात किती मालमत्ता आहे, त्याची घरपट्टी किती, नळ पट्टी किती याची माहिती मिळणार आहेत. त्यानंतर कर भरणा केल्यानंतर त्याची पावती देखील लगेच व्हॉटस्अपवरच मिळणार आहे. त्यामुळे पावती मिळाली नाही अशा तक्रारी कमी होतील.

पालिकेच्या सेवाबद्दलही मिळणार माहिती
हिंगोली पालिकेकडून नागरीकांना दिलेल्या जाणा-या सेवा व विविध प्रमाणपत्रांची माहिती यावर आहे.यामध्ये कोणत्या प्रमाणपत्रासाठी काय कागदपत्रे लागतील याची माहिती त्यावर असणार आहे. त्यामुळे पालिकेत येऊन कागदपत्रांबाबत विचारणा करणा-यांची संख्याही कमी होणार आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या