30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeहिंगोलीप्रधानमंत्री आवास योजनेत हिंगोली मराठवाड्यात अव्वल!

प्रधानमंत्री आवास योजनेत हिंगोली मराठवाड्यात अव्वल!

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत योजनेमध्ये ३१ मार्च यापर्यंत मराठवाड्यात सर्वात जास्त घरकुलांचे काम पूर्ण करून मराठवाड्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर घरकुलांचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी हाती घेतलेल्या महाआवास अभियानाला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मराठवाड्यात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत योजनेमध्ये घरकुलांची जास्तीत जास्त कामे दि. ३१ मार्च पर्यंत पूर्ण करण्याच्या सुचना शासनस्तरावरून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महाआवास अभियान राबविण्यात आले असून या अभियानात घरकुलांच्या बांधकामावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्हयाने ११०७७ घरकुल बांधकामाच्या उदिष्टापैकी ६७११ घरकुलांचे काम पूर्ण करून मराठवाड्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यामध्ये लातुर जिल्हयाने १०९६८ पैकी ६५१८, परभणी ७१७१ पैकी ४१५५, उस्मानाबाद ६११८ पैकी ३४५९, औरंगाबाद २२१४३ पैकी ११६१४, बीड १९७१० पैकी ९६७३, जालना १३७१५ पैकी ६३४९ तर नांदेड जिल्हयात ५००८३ पैकी १९९४७ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. औरंगाबाद विभागात ७७१८७ घरकुलांच्या कामापैकी ४२१३० कामे पूर्ण झाली आहेत.

या शिवाय राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये ंिहगोली ९७४५ पैकी ६७३३, परभणी १४५४३ पैकी ९४०६, लातूर १९९९२ पैकी १११८७, बीड १६४२४ पैकी ७०३६, जालना ९५०८ पैकी ३५७८, औरंगाबाद १७७७० पैकी ६५७२, नांदेड १७८६३ पैकी ६५९६ तर उस्मानाबाद जिल्हयात १५२५१ पैकी ४९५२ घरकुलांची कामे पूर्ण करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागात १०७७३८ पैकी ५३६२२ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. हिंगोली जिल्हयात जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक धनवंत माळी, कर्मचारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी बैठका घेतल्याने हिंगोली जिल्हयाने मराठवाड्याला प्रथम क्रमांक मिळाल्याचे या एकूण कामावरून स्पष्ट होतआहे.तर महा आवास अभियानामध्ये राज्यात मोठ्या संख्येने घरकुलांची कामे अपूर्ण असल्याने या अभियानाला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात सुक्ष्म आराखडा तयार करणार – माळी
जिल्हयात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेमध्ये उर्वरीत कामे पावसाळ्यापुर्वी पुर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुक्ष्म आराखडा तयार करून त्यानुसार कामांना गती दिली जाणार आहे.

रूग्णाच्या मृत्युनंतर नातेवाईक संतप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या