हिंगोली/प्रतिनिधी
हिंगोलीकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत असून हळूहळू ग्रीनझोनच्या दिशेने होणारी वाटचाल आता यू टर्न घेत लाल टरबुजाकडे सुरु झाली आहे. कालरात्री तब्बल ४४ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यात १३ जण सेनगावातील असून ३१ जण हिंगोली येथील लिंबाळा क्वारंटाईन सेंटर मधील आहेत. एकाच दिवशी तब्बल ५० नवे रुग्ण वाढले आहेत. या मध्ये एका समुदाय आरोग्य अधिकाºयाचाही समावेश आहे.
मुंबईहुन येणारे मजूरच आता कोरोनाचे वाहक ठरत आहेत. काल सकाळीच हिंगोलीत परतलेल्या ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात पुन्हा कळमनुरी तालुक्यातील कामठा येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली असतांना काल रात्रीच आलेल्या अहवालाने आणखी मोठा धक्का देत हिंगोलीकरांची झोप उडवली आहे.
Read More कम्युनिटी रेडिओचे जाळे विस्तारणार
सेनगाव तालुक्यातील तब्बल १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या मध्ये मुंबई वरून परतले खुडज येथील ९, दिल्ली येथून बरडा येथे आलेले ३ तर गोरेगाव येथे क्वारंटाईन असलेले सुरजखेडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तर कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथील ३१ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या मध्ये मुंबईवरून परतलेले २२, औरंगाबाद ४, रायगड १, कर्नाटक राज्यातील बिदर येथून आलेला एक, भिरडा येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील २ व्यक्ती तर एका समुदाय आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. जिल्ह्यात शनिवारी तब्बल ५० कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
आता जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५१ एवढी झाली आहे. त्यातील ८९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आहे तर सद्या जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या ६२ वर गेली आहे. आता हिंगोलीकरांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.
हिंगोली शहरात कोरोना संसर्गाची धास्ती
हिंगोली शहरात तब्बल ३१ जणांना कोरोना लागण झाल्याचे काल निष्पन झाले़ परिणामी सकाळपासून शहरात दहशतीचे वातावरण सुरु झाले़ सायंकाळी प्रशासनाकडून सिध्दार्थनगरचा भाग सिल करण्यास प्रारंभ झाला़ या नंतर शहरात अफवाचे पीक वेगाने सुरु झाले.
हिंगोली शहरात पहिल्यांदाच तब्बल ३१ जणांना लागण झाले़ ते ३१ जण शहरातील बहुतांश प्रभागातील नागरीकांच्या संपर्कात आल्याचे चर्चा सुरु होत्या़ परिणामी आता कोरोना संसर्गाच्या साखळीचा धोका शहरात निर्माण झाल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ शहरातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता प्रशासनाला गांभीर्याने पाऊले उचलावे लागणार आहेत.
शहरातील पेन्शनपुरा, बागवानपुरा, खडकपुरा आदी भाग सिल केले जाणार असल्याचे वृत्त आहे़ हिंगोली शहरात कोणकोणत्या भागात कोरोनाचा संसर्ग होवू शकतो, कोरोनाचे पॉझिटीव्ह असलेले रुग्ण कोणत्या भागात पोहचले होते याची माहिती प्रशासनाकडून मिळविली जात असून आता संसर्गाची भिती व्यक्त केली जात आहे़ उशीरापर्यंत व्यवहार उद्या सुरु राहतील किंवा नाही याबाबत प्रशासनाने कोणतेही आदेश काढलेले नव्हते़