सेनगाव (तालुका प्रतिनिधी) राज्य शासनाकडून विद्युत वितरण कंपनी अंतर्गत शेतकर्यासह व्यापाऱ्यांना दिल्या गेलेल्या वाढीव बिलाच्या निषेधार्थ आज दि 23 ऑक्टोंबर रोजी सेनगाव येथे नगरपंचायत समोर भारतीय जनता पार्टी तालुका सेनगाव वतीने विद्युत बिलाची होळी करून राज्य शासन व विद्युत वितरण कंपनीच्या निषेध नोंदविण्यात आला.
संपूर्ण देशासह राज्यात कोविंड-19 या संसर्गजन्य महामारी ने थैमान घातले असून राज्यात शासनाकडून लॉक डाऊन जाहीर करण्यात आला होता या काळात शेतकऱ्यांसह व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले तर राज्यातील सर्वसामान्य मजूरदार वर्गांना आपले जीवन जगण्यास फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला कोविंड-19 या महामारी मध्ये अनेक ठिकाणी बाजारपेठेसह अनेक व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते परिणामी अनेकांना या काळात मोठा आर्थिक मंदीचा फटका सहन करावा लागला याच दरम्यान राज्याचे ऊर्जामंत्री यांनी राज्यातील वीज वापर ग्राहकांना 100 युनिट पर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु ही घोषणा केवळ घोषणा होऊन राहिली असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी कडून करण्यात येत आहे.
तर राज्यातील जगाचा पोशिंदा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते अशा शेतकरी बांधवांना कधी ओला दुष्काळ तर अवेळी पडणारा पाऊस व त्यामध्ये सतत होत असलेली विजेची लपंडाव या या गंभीर समस्यांचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागला या काळात विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना वाढीव विद्युत बिल देऊन त्यांची एक प्रकारे थट्टाच राज्य सरकार करीत असल्याचा आरोपही केल्या जात आहे या वाढीव वीज बिल देऊ केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी तालुका सेनगाव च्या वतीने वाढव बिलाची होळी करण्यात आली यावेळी भारतीय किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष दिनकरराव देशमुख माजी सभापती आप्पासाहेब देशमुख माजी उपसरपंच गणेशराव जारे नगरसेवक संतोष खाडे शहराध्यक्ष तथा नगरसेवक डॉ साहेबराव तिडके किसान मोर्चा तालुकाध्यक्ष पंडित तिडके यापारी आघाडी तालुका अध्यक्ष मुन्ना मुंडे भाजपा युवा कार्यकर्ते श्रीराम देशमुख दिनकर शिराळे संतोष बिडकर शंकरराव देशमुख पानकनेरगावकर संतोष देशमुख पांडुरंग देशमुख यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
फ्रान्सकडून पाकिस्तानला जोरदार चपराक