28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeहिंगोलीहिंगोलीत टाळेबंदीच्या आदेशाची होळी

हिंगोलीत टाळेबंदीच्या आदेशाची होळी

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्हाधिकारी यांनी पुन्हा पंधरा दिवसाची टाळेबंदी वाढविली असल्याने हातावर पोट असणार्‍या मजुरांचे हाल होत आहेत, त्यामुळे लागू केलेला लॉकडाऊन मागे घेण्यासाठी शनिवारी येथील गांधी चौकात राष्ट्रीय विराट लोकमंचच्या वतीने आदेशाची होळी करुन निषेध करण्यात आला. राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा हिंगोली जिल्ह्याची परिस्थिती समाधानकारक असून, आघाडी सरकारची बदनामी करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी यांनी अमानुषपणे लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तो परत घेण्याचा सूचना देण्यात याव्यात. कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे.

निगेटिव्ह आलेल्या व्यक्ती पॉझिटिव्ह येऊ शकतो, मग आयुष्यभर लॉकडाऊन करणार का असा आरोप केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील स्पस्ट केले की, कोरोना बरोबर जगावे लागेल, एक वषार्पासून लहान व्यवसाय बंद पडले असताना त्यांनी जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावायचा असेल तर हातावर पोट असणार्‍या लोकांना दोन वेळेस जेवणाची सोय करा तरच टाळेबंदी लागू करा असे नमूद केले आहे.

यावेळी लॉकडाऊन परत घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय विराट लोकमंच तर्फे गांधी चौकात जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाची होळी करून निषेध करण्यात आला. यावेळी शेख नईम शेख लाल, तौफिक अहमद खान, शेख नौमान नविद नईम, शेख नफिस पहेलवान, तौफिक बागवान, मोहमद तुफेल, मोहमद शकील, मोहमद अमेर अली, परवेज पठाण आदी सहभागी झाले होते.

भारतातील नेत्यांच्या पुनावालांना धमक्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या