Saturday, September 23, 2023

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी अवैध गौण खनिज

हिंगोली : हिगोली ते कनेरगाव नाका या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी गुजरातच्या कंपनीकडून भिरडा शिवारातून गौण खनीजाचे उपसा केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून आज ४ ऑगस्ट रोजी तहसीलच्या १४ जणाच्या जम्बो पथकाने आठ टिप्परसह दोन जेसीबी मशीन देखील जप्त केले. महसूलच्या मोठ्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

हिंगोली ते कनेरनगाव नाका तसेच फाळेगाव ते लासीना पाटी या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. गुजरात येथील एका कंपनीला सदर कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यापूर्वी मुरुम अंथरला जात आहे. यासाठी भिरडा शिवारातून मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. मात्र सदर ठिकाणी केले जाणारे उत्खनन गैरकायदेशीर रित्या असल्याच्या कारणावरून तहसील कार्यालयाच्या पथकाने आज भिरडा शिवारात पाहणी केली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अनिता वडवाळकर, मंडळ अधिकारी खंदारे, पारिसकर, अल्लाबक्ष, तलाठी हर्षवर्धन गवई, वाबळे, प्रदिप इंगोले, सय्यद यांच्यासह सुमारे पंधरा जणांच्या पथकाने आज दुपारी आठ टिप्पर पकडले. या पथकाने सदर टिप्पर तहसील कार्यालयात आणले आहेत. या शिवाय जेसीबी मशीन देखील ताब्यात घेण्याची कारवाई सुरु होती.

दरम्यान, या प्रकरणात आता चौकशी सुरु करण्यात आली असून गौणखनीज उत्खनन करण्यासाठी लागणारी परवानगी, कागदपत्रे सादर करण्यासाठी संबंधीत कंपनीला नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. छोट्या कंत्राटदाराच्या आडून बेकायदेशीररित्या गौणखनीज उत्खनन करून मोठे कंत्राटदार उखळ पांढरे करून घेत असल्याचा आरोप गावक-यांतून केला जाऊ लागला आहे.

Read More  १५ सप्टेंबरनंतर अमेरिकेत टिकटॉकवर बंदी

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या