हिंगोली : मागील सहा महिण्यापासून कोरोनाच्या जैविक संकटाने सण, उत्सव घरातच साजरे केले जात आहेत. यंदा बाप्पा उत्सव देखील मर्यादीत स्वरुपात साजरा केला जात आहे. बहुतांश गणेश मंडळानी यंदा उत्सवात आरोग्याचा जागर केला. आता विर्सजनासाठी पालिकेचे कृत्रिम कुंडदारी येणार आहे. तसेच चार ठिकाणी स्थायी कुंड साकारले जात असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिली.
संकटमोचक बाप्पाच्या उत्सवावर यंदा पहिल्यादांच बंधने लादण्यात आली. मात्र गणेश भक्ताची उत्साह तोच दिसत होता. आता सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करीत बाप्पाचे पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात मोजक्याच उपस्थितीत विर्सजन करावे लागणार आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी यंदा विसर्जन आपल्या दारी या योजनेंतर्गत नगर परिषदेच्या वतीने दोन फिरते विर्सजन कुंड तयार केले आहेत. हे फिरते कुंड गणेश भक्ताच्या दारात जाणार आहेत.
तसेच शहरातील विविध भागात असलेल्या श्री विसर्जनासाठी चार ठिकाणी स्थायी विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहेत. यात एक जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर, दुसरे आदर्श महाविद्यालय मैदान, तिसरे नगरपरिषदेचे अग्नीशमन मैदान, आणि चौथे गांधी चौकात केले जाणार आहे. तसेच पालीकेचे फिरते कुंड वेगवेगळ्या भागात नगरपालिकेचे पथक वाहनाद्वारे जाऊन सार्वजनिक गणेश मंडळाच्या व घरगुती श्री मूर्तीचे विसर्जन यामध्ये केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नेमून दिलेल्या ठिकाणी विसर्जन करावे असे आवाहन मुख्य अधिकारी डॉक्टर अजय कुरवाडे यांनी केले आहे.
चार ठिकाणी विसर्जन
हिंगोली शहरातील चार ठिकाणी विसर्जनासाठी सोय करण्यात आली असून यामध्ये जि.प. शाळेच्या मैदानावर, आदर्श महाविद्यालय मैदान, नगर परिषद अग्नीशामन दल मैदान आणि गांधी चौक या ठिकाणी श्रीचे विसर्जन करण्यासाठी कुंड तयार केले जाणार असल्याची माहिती नगर पािलकेने दिली.
गणेश विसर्जनसाठी कळंब न.प.ने केली पाच फिरत्या वाहनांची सोय