21.8 C
Latur
Monday, September 21, 2020
Home हिंगोली भरपावसात वृध्द महिलेचा खून करत दागीने पळविले

भरपावसात वृध्द महिलेचा खून करत दागीने पळविले

एकमत ऑनलाईन

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील साखरा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांच्या हल्ल्यात ७५ वर्षीय वृध्द महिलेचा खून झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने व इतर ऐवज लंपास केला आहे. घटनास्थळी सेनगाव पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील साखरा येथे मनकर्णाबाई तुळशीराम सरोळे (७५) यांना तीन मुले आहेत. एक मुलगा रिसोड जि. वाशीम येथे तर इतर दोन मुले साखरा येथील बसस्थानका जवळील घरात राहतात. मनकर्णाबाई ह्या जुन्या घरात एकट्याच राहतात. सोमवारी सायंकाळपासून साखरा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होता.

या शिवाय वीज पुरवठा देखील वारंवार खंडीत होत होता. साखरा येथे पाऊस व वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा तसेच मनकर्णाबाई एकट्याच घरी असल्याचा गैरफायदा घेत पहाटे चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. या प्रकाराला विरोध होत असल्याने चोरट्यांनी त्यांना मारहाण सुरु केली. या मारहाणीत त्यांचे समोरील दोन दात पडले तर डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. चोरट्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्या अन त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने पळविले.

दारात पडला होता वृध्दे महिलेचा मृतदेह
आज सकाळी त्या दारात पडलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर शेजारी असलेल्या गावक-यांनी याची माहिती त्यांच्या मुलांना दिली. त्यानंतर त्यांच्या मुलांनी घटनास्थळी पाहणी केली असता मनकर्णाबाई यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने सदर घटना सेनगाव पोलिसांना कळविली. सेनगावच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक दीक्षा लोकडे, उपनिरीक्षक बाबुराव जाधव, जमादार चिंतोरे, महादू शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. या शिवाय श्­वान पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

३५ तोळे चांदी अन् १ तोळे सोन्याचे दागीने
मनकर्णाबाई सरोळे यांच्या अंगावरील ३५ तोळ्याचे चांदीचे दागिने तर एक तोळ्याचे सोन्याचे दागिने पळविले असल्याची माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान या घटनेने साखरा गावात खळबळ उडाली आहे. मनकर्णाबाई ही वृध्द महिला घरात एकटीत होती. पाऊस पडत असतांना विजेचा लपंडाव सुरु असल्याने शेजा-यांना पत्ताच लागला नाही.

निराधार योजना व श्रावनबाळ योजनेतील लाभार्थ्यांची होतेय दलालांकडुन आर्थिक लुट?

ताज्या बातम्या

लातूर जिल्ह्यात ३३० नवे रुग्ण, १२ मृत्यू

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, रविवार दि. २० सप्टेंबर रोजी आणखी ३३० नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण...

इम्रान खान सरकार ‘नालायक’; अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली : नवाझ शरीफ

इस्लामाबाद - पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार 'नालायक' असून गेल्या दोन वर्षात पाकिस्तानातील अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान नवाझ शरीफ...

पहा व्हिडिओ : बापरे…..वाहून जाणा-या तरुणाला गावक-यांनी वाचवल!

नेवासा (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील पुलावरील पाण्यात वाहून जात असलेल्या तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. ही घटना आज (रविवारी)...

बेरोजगारीचा भस्मासुर!

देशावर मागच्या मार्च महिन्यात कोरोनाचे संकट कोसळले! आता सप्टेंबर महिना अर्धा संपलाय पण अद्याप कोरोनाचे संकट थोडेसेही कमी झालेले नाही. उलट दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच...

कांदा निर्यातबंदी पुन्हा शेतक-यांच्या मुळावर !

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. उद्योग, सेवा क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला असून जवळपास १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे....

बीड डेपो आगाराची मालवाहतूक करणारी बस जालना जिल्ह्यात नदीत अडकली

जालना : जालना जिल्ह्यात मालवाहतूक करणारी एक एसटी बस नदीत अडकली. ही बस जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बीड...

मनरेगाने दिला गरिबांना आधार

मनरेगा योजनेअंतर्गत कोविडच्या प्रसारकाळात लाखो मजुरांच्या हातांना काम मिळाले आणि त्यांच्या चुली पेटत्या राहिल्या. कामाची हमी देणारी ही योजना गोरगरिबांसाठी उपयुक्त आहेच; शिवाय ती...

ऑक्सिजन वापराचे होणार लेखापरीक्षण

लातूर : सर्वसाधरणपणे पाच ते सहा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असताना प्रत्यक्षात तीन ते चारपटीने रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात येत असल्याने खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन...

आमदार संभाजी पाटील यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

निलंगा : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचा पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर य्यांच्या घरासमोर रविवार...

चार दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प

जळकोट : सध्या केंद्र सरकारची बीएसएनएल कंपनी ग्राहकांना दूर लोटण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस बीएसएनएलची ग्राहक संख्या कमी होत असताना, याकडे सरकारचे...

आणखीन बातम्या

केंद्र शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु

हिंगोली,दि.18 : केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगाम 2020-21 मध्ये मूग, उडीद हमीभाव खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत....

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ

हिंगोली, दि.17: कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी, तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवून त्यांना आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेस सुरुवात...

हिंगोली जिल्ह्यात ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ

हिंगोली,दि.15: जिल्ह्यातील नागरिकांना स्वसंरक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी आजपासून ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ आज हिंगोली, कळमनुरी आणि वसमत येथील उपविभागीय कार्यालयात करण्यात...

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 48 रुग्ण

हिंगोली : जिल्ह्यात 48 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या...

हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 80 रुग्ण

हिंगोली,दि.12: जिल्ह्यात 80 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन...

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 90 रुग्ण; तर दोन रुग्णांचा मृत्यू

हिंगोली,दि.11: जिल्ह्यात 90 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार...

पेनगंगा नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

हिंगोली,दि.11: भारतीय हवामान विभाग यांच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात 11 ते 14 सप्टेंबर, 2020 या कालावधीत जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच येलदरी ,सिध्देश्वर  व...

पाचशेच्या नोटांचा पाऊस; अज्ञात वाहनातून पाचशे रुपयांच्या नोटा पडल्या

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) :  जिंतूर-औंढा या राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पाचशेच्या नोटांचा पाऊसच पडला. या नोटा कधी पडल्या, कुणाच्या आहेत, किती...

हिंगोलीत बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांची धाड; मोठे अटकसत्र

हिंगोली : हिंगोलीत बनावट नोटा तयार करत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. १०० रुपयांपासून ५००, २००० रुपयांच्या नोटा या ठिकाणी छापण्यात येत होत्या....

वैद्यकीय प्रवेशासाठी ७०:३० चे धोरण रद्द करा-खा. सातव

हिंगोली : मराठवाड्यात वैद्यकीय प्रवेशासाठी लागू असलेल्या सत्तर तीस या जाचक अट रद्द करण्याची मागणी खा. राजीव सातव यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. अमित देशमुख...
1,255FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...