26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeहिंगोलीहिंगोलीत मोफत बियाणांसाठी शेतक-यांची गैरसोय

हिंगोलीत मोफत बियाणांसाठी शेतक-यांची गैरसोय

एकमत ऑनलाईन

हिंगोली : कृषि विभागामार्फत शेतक-यांना मोफत बियाणे वाटप करण्याची योजना सुरु आहे. मात्र सेनगाव शहरातील ऑनलाइन सेंटर अचानक बंद केल्यामुळे शेतक-यांची गैरसोय झाली आहे. राज्य शासनाकडून कृषि विभागामार्फत मोफत बियाणे वाटपाची योजना राबवली जात आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१७) पोलिस प्रशासन व नगरपंचायतकडून सेनगाव शहरातील मेडिकल, दवाखाने, कृषी केंद्र वगळता सर्व दुकाने अचानक बंद करण्यात आले.

सध्या शेतक-यांना मोफत बियाणासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु ऑनलाइन सेंटरसुध्दा अचानक बंद केल्यामुळे बियाणाचे अर्ज सादर करण्यासाठी शेतक-यांची गैरसोय होताना दिसून येत होती. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आता शेवटचे तीनच दिवस शिल्लक राहिल्यामुळे शेतक-यांनी अर्ज सादर करायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आधीच बँकांकडून शेतक-यांना पीक कर्ज वाटप होत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सध्या मे महिना संपत आला असून जून महिन्यामध्ये पेरणीचे दिवस सुरु होत असतात. अशातच बियाणे खरेदी करण्यासाठी शेतक-यांकडे पैसे सुद्धा नाहीत. प्रशासनाने लक्ष देऊन शेतक-यांना मोफत बियाणासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

पैनगंगेत बुडणा-या तरुणाचा जीव वाचवला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या