Tuesday, October 3, 2023

जिल्ह्यात राजगृहावरील हल्ल्याचे तिव्र पडसाद

हिंगोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. तसेच यावेळी राजगृहाच्या काचावर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी जिल्हाभरात सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, जवळाबाजार, औंढा नागनाथ येथे राज्यसरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करण्यात आले.

मुंबईतील राजगृह आंबेडकरी जनतेचे समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. मात्र तिर्थक्षेत्रावरील हल्ला कदापी सहन केला जाणार नाही अशा शब्दात या घटनेचा निषेध करीत याप्रकरणी दोषी आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन हिंगोलीत जिल्हाधिकाºयांना दिले आहे. निवेदनावर मिलींद उबाळे, विशाल इंगोले, निरज देशमुख, स्वप्नील वाठोरे, संतोष खंदारे, अ‍ॅड. हर्ष बनसोडे आदीच्या स्वाक्ष-या आहेत.

गृहमंत्र्यांच्या राजीनामा द्यावा
राजगृह हल्ल्या करणा-यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी करीत जवळाबाजार येथे भीमशक्तीच्या वतीने राज्य शासनाचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी हे आंदोलन युवा तालुकाध्यक्ष प्रमोद कुलदीपके यांच्यासह सागर दिपके, चंद्रकांत वाघमारे, सिद्धार्थ भारशंकर, सुरेश कीर्तने, राहुल वाघमारे, सुरज पवार, संतोष गायकवाड, विशाल वाळवंटे, मुकेश चव्हाण, कपिल थोरात, अनिल भंडारे, सचिन जमदाडे, आकाश मस्के, गोविंद वंजारे, रुपेश मोगले, अनिल राऊत यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

औंढ्यात निषेध
औंढ्यात हल्याचा निषेध करीत आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा आंदोलनाचा इशारा तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे दिला आहे. निवेदनावर काँग्रेस अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सुमेध मुळे यांनी दिला आहे. निवेदनावर प्रभाकर नागरे, राहुल नागरे, सुनील जोंधळे ,किरण पाईकराव ,श्रीकांत इंगळे आदीच्या स्वाक्षºया आहेत.
वसमतला तिव्र निषेध

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठीच राजगृह हे घर बांधले होते. या घरावर हल्ला म्हणजे आमच्या काळजावर हल्ला आणि असे भ्याड हल्ले सहन केले जाणार नाही. ज्या बांडगुळानी हा प्रत्यक्ष हल्ला केला व त्यांना पाठबळ देणाºयावर मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी कठोर कारवाई करा अन्यथा आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत निवेदन सादर करण्यात आले. या वेळी रमेशभाई भूजबळ, सुरेश धोतरे, सोमनाथ शेळके, रुपेश कदम, प्रकाश गव्हाने, विजयकुमार एंगडे, सम्राट गायकवाड, दिपक कदम, उत्तम करवंदे, प्रविण बारहाते, आंबेडकरी अनुयायांयी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कळमनुरीत निषेध
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवानस्थान असलेले ग्रंथालय यावर काही जातीवादी व्यक्तींनी हल्ला केला़ या घटनेचा निषेध करत कळमनुरी येथे मुख्यमंत्री यांना पोलीस निरीक्षक व नायब तहसीलदार पाठक यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले़ दोन दिवसात आरोपी पकडल्या गेले नाहीत तर जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे़ यावेळी वंचित बहजन आघाडीचे राजू कांबळे, आनंद पायीकराव, साहेबराव धनगर सरपंच, श्रावन दिपके, अजय दांडेकर, अमोल पुंडगे, रतन बळखडे, सचिन कांबळे आदींची उपस्थिती होती.

रिपब्लीकन सेनेचे अर्धेनग्न आंदोलन
राजगृहावरील हल्यांच्या निषेधार्थ औंढ्यात रिपब्लिकन सेनेच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करीत आपला संताप व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमºयांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. ही घटना अतिशय निंदÞनिय असून तात्काळ हल्लेखोरांना अटक करावी व राजग्रहाला कायमस्वरूपी झेड प्लस पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे केली. निवेदनावर रिपब्लिकन जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे, आकाश सुतारे, सुनील खंदारे, गोरख खिल्लारे, विवेक सावळे आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत़.यावेळी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार भारत घ्यार, यशवंत गुरुपवार, बालाजी नरोटे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता़

Read More  भारतात दररोज आढळतील २ लाख ८७ हजार करोना रूग्ण

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या