कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तु. येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून ५५० शेतक-यांना ३ कोटी ५६ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला असल्याची माहिती शाखाधिकारी अजिंक्य मेहरे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण बँकेतंर्गत ६०० शेतक-यांना पीककर्ज वाटप करण्यात आले होते. यामध्ये घोडा, कामठा, येहळेगाव तु ., बेलमंडळ, नवखा, नरवाडी, आराटी, जरोडा, चिंचोर्डी येथील शेतक-यांना पीककर्ज वाटप करण्यात आले होते.
कर्जमाफीच्या योजनेमध्ये या गावातील ६०० शेतकरी पात्र झाले आहेत. त्यापैकी ५५० शेतक-यांच्या पीककर्ज खात्यावर ३ कोटी ५६ लाख रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. उर्वरित ५० शेतकºयांची कर्जमाफी होणार असल्याचे बँक शाखाधिकारी यांनी सांगितले आहे. कर्जमाफी अंतिम टण्यात आली आहे. यामुळे शेतक-यांना नव्याने पीककर्ज वाटप करण्यात येत आहे.
Read More ‘मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी, आई भवानी मातेचा उपासक’ उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू