30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeहिंगोलीवसमतच्या कोविड सेंटरमध्ये बेडची कमतरता!

वसमतच्या कोविड सेंटरमध्ये बेडची कमतरता!

एकमत ऑनलाईन

वसमत : मागील पंधरवड्यात कोरोनाची रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दोन दिवसात तीन कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. वाढत्या रूग्णसंख्येमुळे वसमत येथील कोविड केअर सेंटरमध्ये बेडची कमतरता भासू लागली असून, या ठिकाणी आरोग्य विभागाकडून बेड उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

वसमत येथे उपजिल्हा रूग्णलय असून, या रूग्णालयाच्या इमारतीत एका बाजुने कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केअर सेंटर करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचार केले जात आहेत. परंतु, मागील पंधरवड्यापासून वाढत असलेली रूग्णसंख्या लक्षात घेता या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.

कोविड केअर सेंटरमध्ये जवळपास ४९ बेड आहेत. त्या पूर्ण बेडवर रूग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे या ठिकाणी रूग्णांना बेड उपलब्ध होवू शकणार नाही. बेडची कमतरता भासू लागली असून, यापुढे कोरोनाग्रस्त रूग्णांना कोठे ठेवायचे? असा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा ठाकला आहे. त्यासाठी इतरत्र कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी होत आहे. सध्या वसमत उपजिल्हा रूग्णालयातील कोरोना केअर सेंटरमध्ये श्वास घेण्यास त्रास होत असल्याने जवळपास २० रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे.

तर काही रूग्णांची प्रकृती अतीगंभीर आहे. त्याना औरंगाबाद, नांदेड, हिंगोली येथे हलविण्यात आले आहे. पर जिल्ह्याच्या ठिकाणीही बेड उपलब्ध होत नसल्याचे रूग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. शासकीय रूग्णालये, खाजगी रूग्णालयात मोठ्या प्रमाणात रूग्ण दाखल झाल्याने त्या ठिकाणी बेडच उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत अतीगंभीर रूग्णांवर उपचार कसे आणि कुठे करायचे? असा प्रश्न उभा राहत आहे.

लक्षणे जाणवल्यास तात्काळ तपासणी करावी
सदी, ताप, खोकला, थकवा जाणवल्यास तात्काळ कोरोना तपासणी करून घेणे गरजेचे आहे. काही नागरिक अशी लक्षणे आढळून आल्यास मेडिकलवरून गोळ्या नेतात. परंतु, तज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषध घेतल्याने आजार वाढू शकतो. त्याकरीता नागरिकांनी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ शासकीय रूग्णालयात यावे व तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वसमत आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

एमपीएससी परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार रोखा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या