19 C
Latur
Wednesday, October 27, 2021
Homeहिंगोलीकोरोना प्रतिबंधक औषधी, ऑक्सीजन, रेमडिसिव्हरचा तुटवडा

कोरोना प्रतिबंधक औषधी, ऑक्सीजन, रेमडिसिव्हरचा तुटवडा

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यात मागील महिन्याभरापासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. दिवसागणित रूग्णसंख्या वाढत असून, कोरोनामुळे मृत पावणा-या रूग्णांची संख्याही भयावह आहे. या परिस्थितीत मात्र कोरोना केअर सेंटरमध्ये रूग्णांना सुविधांचा सामना करावा लागत आहे. त्याच बरोबर कोरोना प्रतिबंधक औषधी, ऑक्सीजनचा तुटवडाही निर्माण झाल्याने याचा परिणाम रूग्ण, त्यांच्या नातेवाईकांना भोगावे लागत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरीता हिंगोली विधान सभेचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी मंगळवारी (दि.२०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.

हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दहा हजारापार पोहचली आहे. त्यातील सुमारे साडेआठ हजारावर रूग्णांनी कोरोनावर मात केली असलीतरी सध्याची वाढती रूग्णसंख्या आणि औषधी, ऑक्सीजनचा तुटवडा त्याच बरोबर कोरोना केअर सेंटरमध्ये रूग्णांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णांसाठी आवश्यक असणारे आयसीयू बेड शासकीय व खाजगी कोविड सेंटरमध्ये उपलब्ध होत नाहीत. कोवीड सेंटरमध्ये तसेच खाजगी रूग्णालयात ऑक्सीजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. कोरोना रूग्णांसाठी आवश्यक असणारे रेमडीसीव्हर इंजेक्शन वेळेत भेटत नाही.

त्याच बरोबर रेमडीसीव्हरचा काळा बाजारही सुरू असल्याचे पुढे येत आहे. तसेच आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर अहवाल हाती येण्यास सात ते आठ दिवस लागत आहेत. या समस्यावर अनेक वेळा तक्रारी विनंत्या करण्यात आल्या. परंतु, सरकारकडून याकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्यामुळे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी २० एप्रिलला उपोषण केले. जिल्ह्यात पुरेसा औषधीसाठा, ऑक्सीजन पुरवठा, रेमडीसिव्हर इंजेक्शन, आयसीयू बेड, कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.

राज्यातील ७ लाख १५ हजार ऑटोरिक्षा परवाना धारकांना १०७ कोटींची मदत -अनिल परब

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या