26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeहिंगोलीलाडक्या नेत्यास साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

लाडक्या नेत्यास साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

एकमत ऑनलाईन

कळमनुरी : काँग्रेसचे खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांचे रविवारी (दि.१६) कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २३ दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सातव यांच्यावर सो‘वारी (दि.१७) सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या लोकनेत्यास अखेरचा निरोप देताना कार्यकर्त्यांसह सर्वांनाच शोक अनावर झाला होता. खा.राजीव सातव यांचा मुलगा पुष्काराज सातव यांनी मुखाग्नी दिला अन् कार्यकर्त्यांनी हंबरडाच फोडला.

कळमनुरी येथे खासदार राजीव सातव यांचे पार्थिव सोमवारी सकाळी आठ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर त्यांच्या परिवारातील सदस्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, आमदार तानाजी मुटकुळे, अमर राजूरकर, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह राजकिय पक्षाच्या नेत्यांनी तसेच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली अर्पण केली.

सोमवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. कोविडमुळे सामाजिक अंतराचे पालन केले जावे यासाठी पोलिसांनी बॅरीकेंटींग केले आहे. कार्यकर्त्यांना रांगेने अंत्यदर्शन घेण्यासाठी आत सोडण्यात आले. नेत्याचे अखेरचे दर्शन घेतांना कार्यकर्त्यांनी हंबरडाच फोडला. आमचा देव गेला अशा शब्दात कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांना आश्रू अनावर झाले होते. त्यानंतर पोलिस विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

कामावर पुन्हा घेण्यासाठी कामगारांचे धरणे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या