25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeहिंगोलीपरवानाधारक मद्यपींना बारमधून मिळणार घरपोच सुविधा

परवानाधारक मद्यपींना बारमधून मिळणार घरपोच सुविधा

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यातील परवानाधारक मद्यपीना आता बारमधून घरपोच सुविधा मिळणार असून त्या ठिकाणी बसता येणार नाही. केवळ पार्सल सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत. राज्य शासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी एक मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार 13 एप्रिलच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ए\एल तीन, परवानाकक्ष अनुद्यपतींना घरपोच पार्सल सुविधा करण्यासाठी नियम व अटी नुसार परवानगी देण्यात आली आहे. तसेच एफ एल तीन अनुज्ञप्ती वगळता सर्व प्रकारच्या अबकारी अनुद्यांप्ती पुढील आदेशापर्यंत बंद राहतील असे आदेश काढले आहेत.

विदेशी मद्याची विक्री व वितरण ए\एल अनुद्यपतीच्या आवारातून करता येणार आहे. लॉजींगच्या आत आवारातील असलेल्या ए\एल तीन अनुज्ञप्तीना लॉंिजगमध्ये राहण्यासाठी आलेल्या प्रवाशाकरिता सदरची सुविधा देण्यात येईल. परंतू बाहेरील प्रवाशांसाठी या सुविधेचा लाभ मिळणार नाही. जिल्ह्यातील सर्व ए\एल तीन अनुद्यप्तीना सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत केवळ घरपोच पार्सल सुविधा दिली जाणार आहे. विदेशी मद्याची विक्री व वितरण ए\एल अनुद्यपतीच्या आवारातून करता येणार आहे. परवाना धारकाने मागणी नोंदविली तरच परवाना धारकाच्या निवासी पत्यावर वितरीत करता येणार आहे. घरपोच सेवा देण्यासाठी ज्या व्यक्तीची नियुक्ती केली असेल त्यांनी मास्क, सँनिटायझरचा वापर करुन काळजी घ्यावी, राज्यात लागू असलेल्या ब्रेक द चेन बाबतचे आदेश जारी असे पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.

तसेच बारमध्ये काम करणाऱ्या नोकरांचे कोरोना अंटिजन व आरटीपिसीआर अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार परवानाधारक अनुद्यांपती धारकांचा परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला आहे.

भोकरच्या कोरोना सेंटरमध्ये तपासणी किटचा तुटवडा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या