34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeहिंगोलीसंचारबंदी मागे घ्या; व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे

संचारबंदी मागे घ्या; व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे

एकमत ऑनलाईन

हिंगोली : मार्च महिना हा व्यापारी वर्गासाठी तसेच कर सल्लागार संघटना, उद्योजक या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे. आज व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत संचारबंदी मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर व्यापारी व जनतेकडून नियमांचे पालन करण्यासंदर्भात ग्वाही देखील देण्यात आली.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात सात दिवसांची संचारबंदी जाहीर केल्यानंतर आज व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत संचारबंदी मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर व्यापारी व जनतेकडून नियमांचे पालन करण्यासंदर्भात ग्वाही देखील देण्यात आली. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गजानन घुगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या देशामध्ये व्यापारी हा असा घटक आहे. जो देशामध्ये सर्व देशवासियांना सर्वात जास्त सेवा देणारा घटक आहे.सद्यपरिस्थितीत कोरोनाच्या संकटामध्ये व्यापारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्व जनतेस सेवा देत आलेला आहे.

7 मार्च पर्यंत संचारबंदी लागू केली ही संचारबंदी कोरोनाविषाणू रोखण्यासाठी सदर आदेशात नमूद केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील परिस्थिती इतर जिल्हे उदा. वाशिम.अमरावती. नागपूर. वर्धा. अकोला.बुलढाणा.तुलनेत कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रशासनाने निर्बंध लावून व्यापार व अत्यावश्यक सेवा सुविधा सुरळीत चालू कराव्यात. हिंगोली जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील उद्योजक, छोटे व्यापारी, शेतकरी वर्ग, उद्योजकावर अवलंबून असणारे कुशल व अकुशल कामगार, रोजंदारी करणारे रोजमजूर अशाप्रकारे नमुद संपूर्ण यंत्रणा अडचणीत आली आहे. कोरोनाच्या महामारी मुळे पहिले जिल्ह्यातील संपूर्ण व्यवहार व्यवसाय उद्योजक कामगार कुशल व अकुशल कामगार शेतकरी वर्ग सर्वसामान्य जनता मोठ्या अडचणीत सामना मागील एका वर्षापासून करीत आहे.आजच्या घडीला उद्योजक व्यापारी वर्ग व शेतकरीवर्ग थोडा सावरला असताना पुन्हा सात दिवसाचा संचारबंदी ही सर्वांवर अन्याय कारक होणार आहे.

मार्च महिना हा व्यापारी वर्गासाठी तसेच कर सल्लागार संघटना, उद्योजक या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे. या महिन्यांमध्ये आयकर, जीएसटी, ऍडव्हान्स टॅक्स,बँकेचे हप्ते, विमा हप्ते, पीपीएफ व इतर सर्व शासकीय व निमशासकीय देणे ह्या महिन्यात भरणे बंधनकारक असल्याने सर्व यंत्रणा अडचणीत सापडलेली आहे.

सध्या शेतकरी वर्ग सुद्धा संचार बंदीमुळे अडचणीत सापडलेला आहे. कारण ही शेतातील गहू काढणीची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी लागू केलेली संचारबंदी मागे घेण्यात यावी. याबाबत व्यापारी महासंघाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच संचारबंदी शिवाय इतर पर्याय म्हणून निर्बंध घालून हिंगोली जिल्हा कसा कोरोना मुक्त राहील. यासाठी व्यापारी वर्ग , शेतकरी वर्ग सर्वसामान्य जनता प्रशासनास सहकार्य करतील असेदेखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासनाने व्यापारी बाजारपेठ व व्यापारी अस्थापना चालू करण्यासाठी निर्बंध घालून द्यावे. दिलेल्या निर्बंधाचे काटेकोर पालन व्यापारीवर्ग व सर्वसामान्य जनता करतील अशी सक्त ताकीद देण्यात यावी. व्यापारी वर्ग व सर्वसामान्य नागरिक नियमांचे पालन करत नसतील तर निर्बंधांचे पालन न करणाऱ्या व्यापारी व सर्वसामान्य जनता यांना दंड लावण्यात यावा अशी सूचनाही यावेळी व्यापाऱ्यांनी केली. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मा. आ. गजानन विठ्ठलराव घुगे यांच्यासह रमेशचंद बगडिया, प्रकाशचंद सोनी, सुदर्शन कंदी, शहराध्यक्ष पंकज अग्रवाल,सुधीरआप्पा सराफ,आनंद निलावार, मुरलीधर हेडा,इंदरचंदजी सोनी,धरमचंदजी बडेरा, हाजी मुसा , सुभाषचंद्र काबरा, रत्नदीपक सावजी आदींची उपस्थिती होती.

लसीसाठी २५० रुपये कशाला ?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या