24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeहिंगोलीविदर्भाप्रमाणे मराठवाडयात सुध्दा १ जुलै ला शाळा सुरू करा

विदर्भाप्रमाणे मराठवाडयात सुध्दा १ जुलै ला शाळा सुरू करा

एकमत ऑनलाईन

हिंगोली : पावसाळा लवकर सुरू न झाल्याने विदर्भाप्रमाणे मराठवाडयातून सुध्दा दि. १ जुलैला शाळा सुरू करण्याची पालक वर्गातुन मागणी होत असुन, हिंगोली जिल्हा हा विदर्भाला लागुन असल्याने मराठवाडा आणि विदर्भाच्या दोन्ही विभागामध्यभागी पैनगंगा नदी वाहत असुन नदीला लागुनच हिंगोली जिल्हृयाची सिमा आहे.

त्यात कन्हेरगांव नाका नदीजवळच असुन वायचाळ पिंप्री, सुरजखेडा, तपोवन, भगवती, गोरेगाव या गावांच्या सिमेपासुन ३ ते ४ किलोमीटरचे अंतर असुन त्यामुळे विदर्भातील शाळा १ जुलै पासुन सुरू होतात तर विदर्भाला लागुन मराठवाडा जवळच असुन महाराष्ट्र शासनाने उन्हाचा पारा जास्त असल्याने विदर्भाप्रमाणे यावर्षी मराठवाडयात सुध्दा शाळा दि. १३ जून ऐवजी दि. १ जुलै ला चालु करावी, हिंगोली जिल्हृयाच्या पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी उन्हाचा विचार करून मराठवाडयातील शाळा दि. १ जुलै पासुन सुरू करण्याची मागणी होत आहे. तरी शासनाने विदर्भाप्रमाणे शाळा सुरू करण्याचे आदेश काढण्यात यावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या