29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeहिंगोलीहिंगोली जिल्ह्यात २९ मार्च पासून ‘लॉकडाऊन’

हिंगोली जिल्ह्यात २९ मार्च पासून ‘लॉकडाऊन’

एकमत ऑनलाईन

हिंगोली : राज्यात तसेच जिल्ह्यात कोविड-१९ बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण हिंगोली जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी हद्दीतील सर्व प्रकारच्या हालचालीस (व्यक्ती/ वाहन) व सर्व आस्थापना, दुकाने, खानावळ इत्यादी करिता दि. २९ मार्च २०२१ रोजी सकाळी ७ ते दि. ४ एप्रिल २०२१ रोजी रात्री १२ या कालावधीत ७ दिवस संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या कालावधीत खालीलप्रमाणे आदेश लागू केले आहेत.

या कालावधीत दूध विक्री केंद्र, दूध विक्रेते यांना सकाळी ७ ते १० या वेळेत केवळ घरपोच सेवा देण्यासाठी परवानगी असेल. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका या कामकाजासाठी चालू राहतील. या कालावधीत बँका केवळ शासकीय कामकाजासाठी तसेच व्यापा-यांच्या व्यवहारासाठी चालू राहतील. यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना ये-जा करण्यासाठी मुभा राहील. परंतु ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व धार्मिक, प्रार्थना स्थळे, सर्व शाळा, महाविद्यालये, सर्व मंगल कार्यालये, लॉन्स हे बंद राहतील. या कालावधीत औषधी दुकाने चालू ठेवण्यास मुभा राहील. या कालावधीत पत्रकार व त्यांच्या कार्यालयीन कर्मचारी यांना वार्तांकन व कार्यालयीन कामकाजासाठी ये-जा करण्यास मुभा राहील. परंतु सोबत ओळखपत्र ठेवणे बंधनकारक राहील.

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाची कामे व दुरुस्ती करण्यास, आरोग्य, शासकीय विभागाशी संबंधित बांधकामे, महावितरण, महापारेषण आणि इतर विद्युत विषयक विभागाकडील देखभाल व दुरुस्तीची कामे, दूरसंचारशी संलग्न सेवा, पाणीपुरवठा, जलनिस्सारण आणि स्वच्छता विषयक कामे, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परवानगी देण्यात आलेल्या वाळू घाटातून रेती उत्खनन व वाहतूक संबंधित कामे करण्यास मुभा राहील. यासाठी संबंधित विभागाकडील आदेश, ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील. या कालावधीत जिल्ह्यातील पेट्रोल पंप केवळ शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व कृषी सेवा संबंधित वाहने यांना इंधन पुरवठा करण्यासाठी चालू राहतील. या कालावधीत बाहेरील विद्यार्थी , बाहेर जिल्ह्यातील अडकलेले नागरिक यांच्यासाठी परवानाधारक खानावळ, हॉटेल केवळ पार्सल सुविधेसाठी सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत उघडण्यास मुभा असेल.

वरीलप्रमाणे संचाराची मुभा दिलेल्या व्यक्तींना सामाजिक अंतर राखून तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. यानुसार संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा, परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, गावामध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास कडक कार्यवाही करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आह.

लातूर येथील पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरु

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या