29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeहिंगोलीहिंगोली जिल्ह्यात वैद्यकीय सेवा, किराणा वगळता बाजारपेठ बंद !

हिंगोली जिल्ह्यात वैद्यकीय सेवा, किराणा वगळता बाजारपेठ बंद !

एकमत ऑनलाईन

हिंगोली : मागील महिन्याभरापासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्येत होणा-या वाढीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होवू लागली असून, कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने विकेण्ड लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार शुक्रवारी (दि.९) रात्री ८ ते सोमवारी (दि.१२) सकाळी ७ वाजेपर्यंत विकेण्ड लॉकडाऊन राहणार आहे. या लॉकडाऊनला हिंगोलीतील व्यापा-यांनी प्रतिसाद दिला. दरम्यान, किराणा दुकान, वैद्यकी सेवा, मेडीकल सुरू होते. तर काही ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांचे गाडे दिसून आले.

हिंगोली जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा मागील महिन्याभरात कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याच बरोबर कोरोना रूग्णसंख्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. अशीच परिस्थिती सर्व जिल्ह्यात निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाच्या वतीने विकेण्ड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, स्थानिक प्रशासनांना सूचना देण्यात आल्या असून, लॉकडाऊनदरम्यान नियमाची अंमलबजावणी न करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

त्याच बरोबर नियम मोडणा-यांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या विकेण्ड लॉकडाऊनदरम्यान वैद्यकीय सेवा तसेच अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश राज्य शासनाचे आहेत. त्यामुळे हिंगोली शहरासह जिल्ह्यातील किराणा दुकान, मेडीकल, वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी भाजीपाल्याचे गाडे हिंगोली शहरात फिरताना दिसून आले.

 

माणुसकीची परीक्षा!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या