19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeहिंगोलीमोटरसायकल हलगर्जीपणा भोवला; दोघांचा मृत्यू

मोटरसायकल हलगर्जीपणा भोवला; दोघांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सेनगाव( बबन सुतार) : सेनगाव तालुक्यातून नवीन राज्य महामार्गाचे जाळे दिल्या जात आहेत त्यामध्ये फळेगाव येलदरी या राज्य महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून संथ गतीने चालू आहे या महामार्गावर येलदरी सेनगाव लगत असलेल्या नवीन पूलाच्या कामकाजासंबंधि कंपनीकडून होत असलेला विलंब अनेकांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरत आहे दोन दुचाकीस्वार आपल्या मोटरसायकलीवर हलगर्जीपणा करून चालवत असताना हलगर्जीपणा भोवला आन दोघाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना दिनांक 12 सप्टेंबरच्या सकाळी अंदाजे 7:30 वाजताच्या सुमारास घडले आहे यासंबंधी सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेनगाव तालुक्यात नव्याने राज्य महामार्ग बनविण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून संथ गतीने चालू आहे त्यामध्ये फाळेगाव येलदरी या महामार्गाचे काम कल्याण टोल या कंपनी अंतर्गत चालू असून भानखेडा सेनगाव लगत चालू असलेल्या नवीन पुलाचे काम अतिशय धीम्या व संथ गतीने चालू असल्याने अनेकांचा त्यात बळी जाण्यास कारणीभूत ठरत असल्याच्या घटना वारंवार घडत आहे त्यामध्ये मागील 13 जून रोजी नांदेड येथून आपल्या मुलाला भेट घेऊन परत गावाकडे विदर्भातील लोणार तालुक्यातील एका शिक्षकासह तीन शेतकरी बांधवांचा कार खड्ड्यात पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा दिनांक 12 सप्टेंबर रोजी सुमारास खानापूर चित्ता येथील तेजस उर्फ गोलू चंद्रभान पाईकराव वय 26 वर्ष व सचिन दत्तराव पवार वय 25 वर्षे दोघे रा. खानापूर चित्ता ता.जी. हिंगोली येथील रहिवासी असून त्यांनी आपल्या मित्राची विना क्रमांकाची पल्सर मोटरसायकल घेऊन मित्राच्या वाढदिवसासाठी जात आहोत अशी माहिती घरी ठेवून गेले असता ते घरी परत आलेच नसल्याने व त्यांनी आपली दुचाकी हायगय निष्काळजीपणाने चालवून त्यांनी स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरले असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून सदर घटनेचे फ्रीयादी मयताचे वडील चंद्रभान माधवराव पाईकराव वय 45 वर्षे व्यवसाय खाजगी डॉक्टर यांच्या फिर्यादीवरून भा द वि कलम 279, 304 अ प्रमाणे सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या ठिकाणी होत असलेल्या बळीची संख्या एकूण सहा जणांनी आपला जीव गमवावा लागला आहे ही जीव घेणे मालिका होण्यास कल्याण टोल कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकाकडून होत आहे या राज्य महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे तर होत असलेल्या मुलाच्या कामाच्या दिरंगाई बद्दल व सतत होणाऱ्या घटनेबद्दल कल्याण टोल कंपनीच्या विरोधात नागरिकाकडून संताप व्यक्त केल्या जात आहे सदर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी ग्रामीण विवेकानंद वाखारे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड यांनी भेट दिली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश राठोड हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या