29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeहिंगोलीदागिन्यांसाठी वद्ध महिलेचा खून

दागिन्यांसाठी वद्ध महिलेचा खून

एकमत ऑनलाईन

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील साखरा येथील ८२ वर्षीय वृद्ध महिला भारजाबाई मारोती इंगळे यांच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, मारेक-यास रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, मारेक-याने दागिन्यांसाठी हा खून केल्याचे कबूल केले असून, त्याने यापुर्वीही ऑगस्ट २०२० मध्ये साखरा येथीलच मनकर्णाबाई तुळशीराम सरूळे या महिलेचाही दागिन्यासाठी खून केल्याचे उघड झाले आहे.

साखरा येथील भारजाबाई इंगळे यांचा मृतदेह गावापासून ३ कि.मी.अंतरावर अर्धवट पुरलेल्या अवस्थेत १० एप्रिलला आढळून आला होता. याप्रकरणी सेनगाव ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी स्थागुशाचे पोनि उदय खंडेराय, पोउपनि शिवसांब घेवारे, भगवान आडे, राजू ठाकूर, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन यांचे पथक नेमले. पथकाने तपासाची चक्रे फिरवून गुप्त माहितीच्या आधारे साखरा येथीलच दिलीप अंबादास लाटे (३२) यास ताब्यात घेतले.

चौकशीत दिलीप लाटे याने भारजाबाई इंगळे याचा खून दागिन्यांसाठी केल्याचे कबूल केले. सरकारी योजनेची माहिती देण्याच्या बहाण्याने भारजाबाई यांच्या घरी जावून त्यांच्या खाण्यात झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यांना झोप लागताच संधी साधून दिलीप लाटे यांनी डोक्यात दगड घालून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने भारजाबाईचा मृतदेह रात्रीच्या वेळी गावाबाहेर नेवून खड्ड्यात पुरल्याचेही सांगितले. पोलिसांना साखरा येथेच ऑगस्ट २०२० मध्ये मनकर्णाबाई तुळशीराम सरुळे या वृद्ध महिलेच्या मारेकरीही अद्याप हाती लागलेला नव्हता.

त्या घटनेबद्दलही आरोपी दिलीप लाटे यांची चौकशी केली असता मनकर्णाबाई सरूळे यांचा खूनही दागिन्यांसाठीच केल्याचे दिलीप लाटे याने कबूल केले. रात्रीच्या वेळी सरकारी योजनेची माहिती सांगण्याचा बहाणा करून मनकर्णाबाईस मारल्याचे दिलीप लाटे याने पोलिसांना सांगितले.दरम्यान, आरोपी दिलीप लाटे याने दागिन्यांसाठी दोन खून केल्याचे कबूल करताच पोलीसही चक्रावले. लाटे याच्या विरोधात दोन खुनाचे गुन्हा नोंदविण्यात आले आहेत.

योजनांची माहिती देण्याच्या बहाण्याने साधायचा जवळीक
गावातील वृद्ध महिलांना सरकारी योजनांची माहिती देवून लाभ मिळवून देतो म्हणून आरोपी दिलीप लाटे हा जवळकी साधायचा. रात्रीच्या वेळी माहिती देण्याकरीता तो महिलांच्या घरी जावून संधी मिळताच खून करायचा. त्यानंतर महिलेच्या अंगावरील दागिने काढून पसार व्हायचा. ऑगस्ट २०२० मध्ये साखरा येथील मनकर्णाबाई सरूळे या महिलेचा तिच्याच घरी खून करून दागिने काढून घेत मृतदेह त्याच ठिकाणी ठेवला. तर भारजाबाई इंगळे यांचा मृतदेह गावापासून ३ कि.मी.अंतरावर नेवून खड्ड्यात पुरला होता.

आरोग्यदायक मीठ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या