22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeहिंगोलीऔंढा तालुक्यातील गावामध्ये भूगर्भातून गूढ आवाज

औंढा तालुक्यातील गावामध्ये भूगर्भातून गूढ आवाज

एकमत ऑनलाईन

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावांमधून बुधवारी (दि.१९) सकाळी साडेसहा वाजता भूगर्भातून मोठा आवाज झाल्याने गावक-यांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून सतत होणारे आवाज गावकèयांसाठी साठी चिंतेचा विषय बनले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यात सोबतच कळमनुरी, वसमत तालुक्यातील काही गावातून मागील दोन ते तीन वर्षापासून भूगर्भातून सतत आवाज होऊ लागले आहेत. अचानक भूगर्भातून होणारा गडगडाट यामुळे गावक-यांना चांगलीच धडकी भरली आहे.

या ठिकाणी भूगर्भातून कशामुळे आवाज होतात याबाबत पाहणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भारतीय मेट्रोलॉजिकल विभागाला कळविले आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने गावक-यांना भुकंपा सारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय करावे आणि काय करू नये याबाबत जनजागृतीही केली आहे. तसेच प्रशासनाचे अधिकारी वेळोवेळी या गावांना भेटी देऊन पाहणी देखील करीत आहेत.

नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या पथकाने या परिसरात घेऊन पाहणी केली होती. भूगर्भात असलेल्या पोकळीमध्ये पाणी शिरल्यानंतर मोठा आवाज होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळी साडेसहा वाजता औंढा तालुक्यातील पिंपळदरी राजदरी, सोनवाडी, जांभरून कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव, नांदापूर, बोल्डा, वसमत तालुक्यातील वापटी, पांगरा शिंदे आदीसह परिसरातील काही गावांमधून भुगर्भामधून मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले अवघ्या काही सेकंदात मोठा आवाज होऊन गडगडाट झाला. मात्र याबाबत भूकंपाची नोंद झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. परिसरात मागील दोन ते तीन वर्षापासून होणारे आवाज गावक-यांसाठी चिंतेचा विषय बनले असून एकीकडे कोरोना तर दुसरीकडे भूगर्भातील आवाज यामुळे गावकरी चांगलेच कात्रीत अडकले आहे.

दरम्ङ्मान, औंढा सह परिसरातील तालुक्यातील काही गावांमध्ये भूगर्भातून सतत होणारे आवाज गावकर्यांना धडकी भरवणारे ठरु लागले आहे. प्रशासनाने आता वरिष्ठ पातळीवरील शास्त्रज्ञांकडून या परिसरात सर्वेक्षण करावे व नेमका आवाज कशामुळे येत आहे याची माहिती गावक-यांना द्यावी. त्यामुळे गावकèयां मधून भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पिंपळदरी येथील बापूराव घोंगडे यांनी व्यक्त केली.

लातूरात पेट्रोल शंभरी पार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या