Saturday, September 23, 2023

नागपंचमी असूनही नागनाथ मंदिर सामसूम

हिंगोली : व्दादश ज्योर्तिलींगात आठवे जागृत देवस्थान औंढा नागनाथ मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच शिव भक्ताविना नागपंचमी उत्सव साजरा करावा लागला. नागपंचमीला अलंकार पुजा असते़ मोठी यात्रा देखील भरते़ मात्र चार महिन्यापासून मंदिर बंद असल्याने आज मंदिर सामसुम होता.

नागनाथ मंदिरात नागपंचमीस लाखो शिवभक्त दर्शनासाठी येतात. यामुळे पंचमीला शेकडो दिंड्या तसेच कावड मंदिरात दाखल होतात. पंचमीला मोठी वार्षिक यात्रा भरत असते. उत्सवाच्या निमीत्ताने नागनाथाची अलंकार पुजा केली जाते. त्यामुळे मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून जाते. ज्योतिर्लिंग नागनाथ सगळ्यांची मनोकामना पूर्ण करत असतं अशी श्रद्धा या ठिकाणी भाविकांची आहे. परंतु गेल्या चार महिन्यांपासून जगावर कोरोनाचे संकटामुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद आहे. त्यातच हा नागपंचमी महाउत्सव आलेला आहे. त्यामुळे आज गावातील शिवभक्तांनी आज घरी बसून देवाची मनोभावे पूजा करत आहे. याठिकाणी नागरूपामध्ये देवाची पूजा बांधली जाते.

चार महिन्यापासून देवुळ बंद असल्याने या भागातील व्यापा-यांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे. गावातील पुरोहित मंडळी देखील मंदिर बंद असल्याने अर्थिक संकटात आहे. श्रावण महिना वृतवैकल्याचा महिना असतो़ या महिन्यात पुरोहितांना मोठी अर्थप्रात्ती होते़ मात्र यंदा श्रावण महिना देखील अडचणीचा ठरत आहे.

Read More  गोपनीय कराराने वाढवली चिंता : चीन आणि पाकिस्तानची सिक्रेट डील

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या