Tuesday, September 26, 2023

व्यंकय्या नायडूंच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

हिंगोली : जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा देण्यापासून खुद्द छत्रपतींचे वंशज श्रीमंत उदयनराजे भोसले महाराजांना रोखण्याचा प्रयत्न करणा-या उपराष्ट्रपतीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने निषेध नोंदवत जिल्ह्यातुन २५ हजार पत्र पाठविण्याचा इशारा देण्यात आला.

राकाँच्यावतीने आज जयभवानी जय शिवाजी लिहीलेले पत्र पाठवत निषेध नोंदवला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे, माजी नगराध्यक्ष जगजितराज खुराणा, युवक जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, हिंगोली तालुकाध्यक्ष केशव शांकट, शहराध्यक्ष इरफान पठाण, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष सुरज वडकुते, जिल्हा सचिव रशीद तांबोळी, शहर संघटक योगेश डहाळे,भाऊ ठाकरे, गणेश शिंदे, शहर उपाध्यक्ष इमाम बेलदार, जगगु बांगर, सुरज बांगर, रवि घुगे, विकास सोनटक्के, महेश बांगर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलतांना युवक राकॉ जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे यांनी दिल्लीच्या तख्ताकडून महाराष्ट्राचा अपमान करण्याचे अनेक प्रसंग इतिहासात घडले आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने याच दिल्लीचे तख्त महाराष्ट्राने आपल्या मुठीत ठेवले होते हा ही इतिहास कोणी विसरू नये.

छत्रपती आणि महाराष्ट्राचा अपमान करणा-या भाजपाच्या व्यंकैया नायडू यांनी लक्षात ठेवावे की, आमच्या रंगारंगात शिवछत्रपतींचे रक्त आहे आणि पुन्हा एकदा आम्ही दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकवू असा इशारा दिला. यावेळी सोशियल डिस्टन्सींग पाळत शेकडो पत्रावर जय भवानी जय शिवाजी लिहुन उपराष्ट्रपतींना पाठविण्यात आली.

Read More  कोरोना दवाखान्यात सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या