हिंगोली : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज दोन नवीन आदेश जारी करीत अनेक निर्बंध घातले आहेत. ज्यामध्ये वैद्यकीय कारणामुळे इतर जिल्ह्यात जाण्याकरिता कोणालाही ई-पास मिळणार नाही तर सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व बँकांमधील पैसे काढण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे.
हिंगोली शहरासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना केल्या जात आहेत. विशेष बाब म्हणजे ई-पासच्या नावाखाली किरकोळ करणावरून जिल्ह्याबाहेर जाणा-यांची व येणाºयांची संख्या वाढत आहे.
ही बाब लक्षात घेऊन यापुढे केवळ वैद्यकीय कारणासाठी ंिकवा अपरिहार्य कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याकरिता ई- पास दिला जाणार आहे. याकरिता संबंधित व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालय ंिकवा जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-यांकडून तपासणी करून प्रमाणपत्र घेणे अनिवार्य राहणार आहे. त्यानंतर गरज लक्षात घेऊनच ई-पास देण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिले आहेत.
Read More तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न