22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeहिंगोलीहिंगोलीत ई-पासविना प्रवेशास बंदी

हिंगोलीत ई-पासविना प्रवेशास बंदी

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यात येणाऱ्या जिल्ह्याच्या सिमेवर नाकाबंदी लाऊन सर्व वाहनांची तपासणी करा तसेच ई-पास असल्या शिवाय बाहेर जिल्ह्यातील कोणत्याही खाजगी प्रवाशी वाहनांना हिंगोली जिल्हयात प्रवेश देऊ नये अशा स्पष्ट सुचना पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी शनिवारी (दि.२४) रोजी पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना दिल्या आहेत.

येथील पोलिस अधिक्षक कार्यालयात शनिवारी सकाळी दहा वाजता पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या हस्ते अधिकारी व कर्मचा-यांना मास्क, सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, सुरेशअप्पा सराफ यांची उपस्थिती होती. यावेळी पोलिस अधिक्षक कलासागर यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना मार्गदर्शन केले.

जिल्हयातील शंभर टक्के पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी कोरोना लस घ्यावी. ज्या कर्मचा-यांचे लसीकरण राहिले आहे त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. तसेच पोलिस विभागातर्फे बुधवारी (दि.२८) विशेष लसीकरण मोहिम घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या परिस्थितीत बंदोबस्तावर असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांनी विनाकारण फिरणा-या नागरीकांवर कारवाई करतांना सामाजिक अंतर राखूनच कारवाई करावी. कुठल्याही परिस्थितीत काठी व बळाचा वापर करू नये.

सध्याची परिस्थिती गंभीर असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची परिस्थिती लक्षात घेऊनच कामकाज करावे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना तातडीची मदत लागल्यास बंदोबस्तावरील कर्मचा-यांनी त्यांना मदत करावी त्यांची विनाकारण चौकशी करून त्यांना थांबवून ठेऊ नये अशा सुचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील पोलिस कर्मचा-यांनी बाहेरगावी बंदोबस्तासाठी जातांना qकवा शासकिय कामकाजासाठी दुचाकी वाहनावर जातांना हेल्मेट वापरावे. त्यामुळे दुर्देवी घटना घडणार नाहीत.

जिल्हयात येणा-या सर्व रस्त्यांवर तपासणी नाके सुरु करावेत. या ठिकाणी सर्व खाजगी वाहनांची तपासणी करावी. त्यांच्याकडे ई-पास असेल तरच त्यांना जिल्हयात प्रवेश द्यावा अन्यथा त्यांना जिल्हयात प्रवेश देऊ नये. मात्र ऑक्सीजन व औषधींची वाहतुक करणाèया वाहनांची केवळ चौकशी करून त्यांना तातडीने जिल्हयात प्रवेश द्यावा. ऑक्सीजन वाहतुक करणारी वाहनांना चौकशीसाठी कुठेही थांबवून घेऊ नये अशा स्पष्ट सुनचाही पोलिस अधिक्षक कलासागर यांनी दिल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यात कोविड-१९ चे नवीन ३२३ रुग्ण ; तर २८२ रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या