हिंगोली/प्रतिनिधी
कोरोनाने आता नवजात बालकाला लक्ष केले असून चार महिन्याच्या बालकासह नऊ वर्ष व बारा वर्षाच्या बालिकेलेसह आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे काल रात्री निष्पन्न झाले यानंतर आज सकाळी आलेल्या अहवालात एका बारा वर्षीय बालिकेला कोरोनाची लागण झाली व एका १७ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली़ एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ७७ वर गेला आहे.
वसमत येथील कोरोना केअर सेंटर मध्ये भरती असलेल्या व मुंबई वरून वसमत येथे आलेल्या ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रात्री आलेल्या अहवालात निष्पन्न झाले़ या मध्ये एका ४ महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. तसेच हिंगोली येथील कोरोना केअर सेंटर मध्ये भरती असलेल्या ९ वर्षीय व १२ वर्षीय बालिकेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर आज सकाळी आलेल्या अहवालात एका बारा वर्षीय मुलीला व अन्य एका १७ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे.
विशेष म्हणजे सर्व रुग्ण मुंबईहून कोरोनाचा प्रसाद घेवून आलेत हे विशेष म्हणावे लागेल़ दुसरीकडे समाधानाची बाब म्हणजे वसमत येथील कोरोना केअर सेंटर मध्ये भरती असलेल्या ५ जणांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये हट्टा येथील तिघे व वसमत शहरातील दोघांचा समावेश आहे. तर हिंगोली तालुक्यातील भिर्डा येथील एकास सुट्टी देण्यात आली आहे.
आता जिल्ह्याची एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या १८२ वर पोहोचली आहे. तर १०५ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे.
Read More परभणी : दोन भावांचा धरणात बुडून करुण अंत
कोरोना बाधित ७७ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. यामध्ये कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे ८, सेनगाव येथे १२, हिंगोली येथे ३१, वसमत येथे १२, औंढा येथे १ या सर्वांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. याशिवाय हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमध्ये १३ रुग्ण दाखल आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ३० जूनपर्यंत १४४ कलम लागू
जिल्ह्यात १ जून ते ३० जूनपर्यंत जमावबंदी आदेश लागू करीत असून या कालावधीत पाच व त्या पेक्षा जास्त व्यक्तींनी जमण्यास किंवा एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, खबरदारीचा उपाय म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाºयावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
या आदेशान्वये हिंगोली जिल्ह्यात सांस्कृतिक, सभा, आंदोलने, निदर्शने, धरणे, कार्यक्रम, सण, उत्सव, उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम क्रिडा व इतर सर्व स्पर्धांना मनाई करण्यात येत आहे. तसेच खाजगी व सार्वजनिक ठिकाणी कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, निदर्शने, धरणे, देशातंर्गत व परदेशी सहली इत्यादीचे आयोजन करता येणार नाही. तसेच जिल्ह्यात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व दुकाने, सेवा आस्थापना, उपहार गृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपींग कॉम्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालय तसेच सर्व प्रार्थनास्थळे (उदा. मंदीर, मस्जीद, चर्च, गुरुद्वारा, बौध्द विहार इत्यादी) जनतेसाठी बंद राहणार आहेत असे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत़