हिंगोली : कोरोना विरोधातील मोहिमेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रनेचे सुत्रसंचालन करणारा डिसीजन मेकरच पॉझिटीव्ह निघाला. परिणामी आता प्रत्येक विभागप्रमुख आणी पदाधिका-यांना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कोरोनाचा चंचुप्रवेश झाल्यानंतर केवळ आरोग्यविभागाचा भाग सिल करण्याचा तुघलकी निर्णय प्रशासनाच्या अंगलट आला. तो कर्मचारी चार दिवसापासुन कार्यालयात आलाच नाही म्हणत अतिघाईने मिनीमंत्रालयात कामकाज सुरु केले. परिणामी अतिघाई संकटात नेई अशीच काहीशी अवस्था मिनीमंत्रालयाची झाली आहे.
आज आलेल्या अहवालातुन एक बडा अधिकारी पॉझिटीव्ह आला असल्याचे वृत्त आहे.
मिनीमंत्रालयात प्रत्येक विभागप्रमुख आणी अधिकारी यांचे थ्रोट स्वॅब आता तपासले जाणार आहेत. याच बरोबर साहेब पॉझिटीव्ह आल्याने पदाधिका-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आता मिनीमंत्रालयातील अधिका-याजवळ जाणा-या कोरोना विषाणूने किती जणाला आपला प्रसाद दिला याची माहिती आता समोर येणार आहे. कारण बड्या अधिका-याच्या दालनात सर्वाचा वावर असतो.
जिल्हा परिषदेतील सभापती तसेच अन्य पदाधिकारी देखील साहेबांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापुर्वी अधिका-याचे स्वॅब घेण्यात आले होते. असे विश्वसनिय वृत्त आहे. यामुळे अधिकारी, शिपाई आणी वाहन चालकात मात्र चांगलीच भिती निर्माण झाली आहे.साहेबच पॉझिटीव्ह समजताच जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. आज सकाळीच साहेबांना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सध्या २११ कोरोनाग्रस्तावर उपचार सुरु
कोराणाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून काल उशिरा रात्री आलेल्या अहवालानुसार आठ जणांना नव्याने लागण झाली आहे. यातील तीन जण अॅन्टीजन तपासणी नुसार पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील पोस्ट ऑफिस भागात एक 65 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 60 वर्षीय स्त्री, महाविर नगर भागातील 27 वर्षीय स्त्री व व यशवंत नगर येथील तीस वर्षीय स्त्री चा समावेश आहे. तर वसमत येथील एक आणि गोरेगाव येथे तिघांचा समावेश आहे.दरम्यान काल पंधरा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संपर्कातील कोण?
मिनीमंत्रालया तील साहेब पॉझिटीव्ह आढळल्यानंतर आता साहेबांच्या संपर्कात कोण कोणते अधिकारी आले याची माहिती घेतली जात आहे.दरम्यान विभागप्रमुखांचे थ्रोटस्वॅब घेतले जाणार असल्याचे वृत्त आहे.दरम्यान मिनीमंत्रालयातील कामकाज बंद ठेवावे लागणार.
Read More कोरोनाबाधितांच्या संख्या १७ लाखावर