22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeहिंगोलीहिंगोलीत वीज पडून एकाचा मृत्यु

हिंगोलीत वीज पडून एकाचा मृत्यु

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे एका शेतकर्‍यांच्या अंगावर वीज पडून मृत्यु झाला आहे. शेतात काम करताना अचानकपणे विजाच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यात जयपूर येथील नागनाथ दत्तराव पायघन वय (३५) वर्ष यांचा वीज पडून मृत्यु झाला आहे. सदरील घटना दि. ३० जुलै रोजी दुपारी १.३० मिनिटांनी घटली आहे.

हिंगोली जिल्ह्यात गेल्या २० दिवसांपासून जिल्ह्यात सततधार पाऊस पडत आहे. सकाळपासुन पावसाने उघडीप दिल्याने नागनाथ पायघन शेतात काम करत होते मात्र दुपारी वादळी वार्‍यासह विजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला व सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील शेतकरी नागनाथ पायघन यांचा मृत्यु झाला. वीज अंगावर पडल्याचे कळताच त्याना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरानी त्याना मृत घोषित केले. त्यामुळे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या