27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeहिंगोलीआजपासून प्रतिबंधमुक्त दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश

आजपासून प्रतिबंधमुक्त दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश

एकमत ऑनलाईन

हिंगोली : राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविला असून हिंगोली जिल्ह्यात १ ते ३१ ऑगस्ट पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. व्यापा-यांना दिलासा मिळाला असून सकाळी ९ ते रात्री ७ वाजेपर्यंत दुकाने ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी काढले आहेत.

जिल्हाधिकारी रुचेश जशवंशी यांनी उद्या १ ऑगस्टपासून कंटेनमेंट झोन, गाव भाग वगळता हिंगोली जिल्ह्यातील सर्व दूकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सूरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. जिल्हा अंतर्गत सर्व बस वाहतूक सेवा, प्रती बस वाहन क्षमतेच्या ५० टक्के पर्यंतच्या मर्यादेत सामाजिक अंतराचे पालन करुन सुरु करता येईल. परंतु आंतर जिल्हा बस सेवा सुरु करण्यास बंदी असेल. स्वयंरोजगाराशी संबंधीत व्यावसायिक जसे कि प्लम्बर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल, टेक्निशियन इत्यादींनी काम करते वेळी सामाजिक व सुरक्षित अंतराचे पालन करावे व मास्क वापर करावा.

रेडीमेड कापड दुकानदार, ज्वेलरी दुकानदार व ज्या दुकानाच्या ठिकाणी ट्रायल रूमचा वापर करण्यात येतो अशा ठिकाणी विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रायल व ट्रायल रुमच्या वापरावर बंदी करण्यात येत आहे. तसेच एकदा घेतलेला माल परत करणे बदलून घेणे यास बंदी असेल. शासन प्रशासनाने परवानगी दिलेल्या बाबी साठी वेगळ्याने परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. सर्व खाजगी व सार्वजनिक बांधकामे सामाजिक अंतराचे पालन तसेच मास्कचा वापर करून करण्यास परवानगी राहील.

तसेच पूर्व पावसाळी ( मान्सून) खाजगी व सार्वजनिक बांधकामे सामाजिक अंतर राखून तसेच मास्कचा वापर करून करण्यास परवानगी राहील प्रतिबंधीत वगळून जिल्हा अंतर्गत दुकाने, उद्योग, व्यवसाय, आस्थापना दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ यावेळेत अटीच्या अधीन राहून सुरु ठेवता येतील. लग्नासाठी ५० व्यक्तींची मर्यादा, तर अंत्यविधीसाठी २० लोकांची मर्यादा राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

क्रिडा मैदाने राहतील सुरु
क्रिडा संकुल, क्रिडा मैदाने व इतर सार्वजनिक खुली मैदाने वैयक्तिक व्यायामा करिता चालू राहतील. परंतु प्रेक्षक व सामुहिक कार्यक्रमासाठी अशा ठिकाणी बंदी असेल. सर्व शारीरिक व्यायाम, जॉंिगग, सायकंिलग, चालणे , पळणे व ई . हालचाली शेजारच्या किंवा जवळच्या खुल्या जागी सकाळी ५ ते सायंकाळी ७ पर्यंत सामाजिक व सुरक्षित अंतर ठेवून मर्यादित कालावधीत करता येतील. परंतु याकरिता दूर अंतरावरील मैदाने, खुल्या सार्वजनिक जागेवर जाऊन वरील खेळ, व्यायाम ई . करण्यास प्रतिबंध असेल.

Read More  पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते -रावसाहेब दानवे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या