22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeहिंगोलीहिंगोलीत उभारणार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प

हिंगोलीत उभारणार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प

एकमत ऑनलाईन

हिंगोली : शहरासह जिल्हाभरात वाढत्या कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेऊन ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची मागणी खासदार अ‍ॅड.राजीव सातव यांनी केली होती. त्यानुसार पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी या प्रकल्पा संदर्भात जिल्हा प्रशासनाला सुचना दिल्या आहेत. त्यामुळे ंिहगोलीत लवकर ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

हिंगोली जिल्हयात मागील तीन महिन्याच्या कालावधीत कोविड रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आतापर्यंत रुग्णांचा आकडा १० हजार पार गेला आहे. या शिवाय १२५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच ५०० पेक्षा अधिक रुग्णांना सध्या ऑक्सीजनची गरज आहे. मात्र मागील आठवडाभरापासून ऑक्सीजनचा तुटवडा भासू लागला आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर यांनी पुरवठादाराकडे पाठपुरावा केल्यानंतर ऑक्सीजनसाठी उपलब्ध होऊ लागला आहे.

मात्र नेमका ऑक्सीजनचा कुठल्याही क्षणी तुटवडा जाणवण्याची भिती व्यक्त होत आहे. रुग्णालयातील ऑक्सीजन व्यवस्थे संदर्भात खासदार राजीव सातव यांनी पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्र पाठविले आहे. ंिहगोलीत वाढत्या रुग्ण संख्येमुळे ऑक्स­जिनची गरज वाढली आहे. त्यासाठी ंिहगोली येथेच ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची मागणी केली. या शिवाय व्हेटीलेटरची देखील आवश्­यकता आहे. तसेच डोंगरकडा, शिरडशहापूर व भांडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्ययावत कोरोना सेंटर सुरु करावा तसेच रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

त्यानुसार पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाची युध्दपातळीवर उभारणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दिल्या आहेत. या शिवाय ऑक्सीजन बेड, रेमडेसीवीर इंजेक्शन तसेच व्हेंटीलेटर वाढविण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच हिंगोलीत ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे.

सैंधव मीठ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या