24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeहिंगोलीमध्यान्ह भोजनात निकृष्ट अन्नावरून आ. बांगर यांनी लगावली व्यवस्थापकाच्या कानशिलात

मध्यान्ह भोजनात निकृष्ट अन्नावरून आ. बांगर यांनी लगावली व्यवस्थापकाच्या कानशिलात

एकमत ऑनलाईन

हिंगोली : आक्रमक भाषणासाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कामगारांसाठी असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी उघडकीस आणले. एका उपहारगृहाची पाहणी करायला गेलेल्या आमदार बांगर यांचा निकृष्ट दर्जामुळे पारा चांगलाच चढला. संतप्त झालेल्या आमदारांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. याचा व्हीडीओ व्हायरल होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने नोंदणीकृत आणि विना नोंदणीकृत असलेल्या सर्व कामगारांना मध्यान्ह भोजन दिले जाते. परंतू हे मध्यान्ह भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचा पर्दाफाश बंडखोर शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. जेवणाचा निकृष्ट दर्जा आणि शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यू प्रमाणे जेवण न दिल्यामुळे आमदार बांगर यांनी जाब विचारत व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. निकृष्ट दर्जाचे मध्यानभोजन कामगारांना देत असल्यामुळे आमदार बांगर चांगलेच आक्रमक झाले होते.

कामगारांना मध्यान भोजन पुरवण्याची जबाबदारी खासगी कंत्राटदाराकडे देण्यात आली आहे. संबंधित कंत्राटदाराकडून ती कंपनी अत्यंत निकृष्ट दर्जाचा आणि शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यूचा कोणताही अवलंब न करता जेवण कामगारांना दिले जात होते. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणी आमदार बांगर यांनी केली आहे. या प्रकरणामुळे बंडखोर शिवसेना आमदार संतोष बांगर पुन्हा चर्चेत आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या