22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeहिंगोलीखाजगी डॉक्टरांकडुन आरोग्य यंत्रनेचे पोस्टमार्टम!

खाजगी डॉक्टरांकडुन आरोग्य यंत्रनेचे पोस्टमार्टम!

एकमत ऑनलाईन

हिंगोली : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना राज्यशासनाची अनलॉक ची घाई सुरू आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना नागरीकात भितीचे वातावरण असतांना खाजगी डॉक्टराकडुन आरोग्य यंत्रणेचे पोस्टमार्टम केले जात आहे. यामुळे शासकीय यंत्रणेने संदर्भात साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

हिंगोली येथील अंधारवाडी क्वारंटाईन सेंटरमध्ये तब्बल 17 दिवसांपासून डॉक्टर आलोक मोहन काबरा हे भरती आहेत. त्यांच्या वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने डॉक्टर काबरा यांना १६ जुलै रोजी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे तीन वेळा स्वॅब घेण्यात आले परंतु तीनही वेळा इनकप्लुझीव्ह येत आहे. १४ दिवसात तर पॉझिटीव्ह रुग्ण निगेटिव्ह होतो. मला कोरोनाची कसली लक्ष नसताना विलगीकरण कक्षातून सुट्टी मिळत नाही. दुसरीकडे त्यांचे वडील पॉझिटिव आढळले होते त्यांना डिस्चार्ज मिळाला. यामुळे डॉक्टरांनी एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

अंधारवाडी क्वारंटाईन सेंटर भागात कमालीची अस्वच्छता असल्याने इथेच कोरोनाची लागण होऊ शकते असा आरोप करीत मला प्रशासनाने डिस्चार्ज द्यावा म्हणत एका डॉक्टराचे इतके हाल होत आहेत तर सामान्याचे काय?असा सवाल केला आहे.
दुसरीकडे सामान्य रुग्गालयातील आयसोलेशन कक्षात उपचार घेत असलेले खाजगी डॉक्टर राजेश भोसले यांनी तर थेट जिल्हा शल्य चिकीत्सकांनी चहा पिऊन दाखवल्यास आपण ५ हजाराचे बक्षीस देऊ असे आव्हान सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल करीत दिले आहे. त्या पोस्टमध्ये रुग्णालय केवळ कंपाउंडर आणि नर्सेस चालवत आहेत, रुग्णालयात दिले जाणारे जेवण चहा अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

दोन दिवसापासुन जनरेटरमध्ये झाली बिघाड
जिल्ह्यात कोरोणाचे संकट दिवसेंदिवस वाढत असताना सामान्य रुग्णालयातील दोन्ही जनरेटरनी दोन दिवसापुर्वीच मान टाकली. परिणामी जनरेटर बंद असल्याने रुग्णालयातील गंभीर रुग्णाची चिंता वाढली आहे सामान्य रुग्णालयातील प्रशासन एकीकडे उत्कृष्ट पद्धतीने काम करीत असल्याचा दावा केला जात असताना विज पुरवठा गुल झाल्यावर आयसोलेशन कक्षात गंभीर रुग्णांना ऑक्सीजन कसे दिले जाते असा सवाल होत आहे.यासंदर्भात माहिती घेतली असता नांदेडहुन कारागिर येत असल्याचे सांगण्यात आले.

Read More  ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून धारावी पॅटर्नचा गौरवोद्गार

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या