28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeहिंगोलीधाब्यावर चालणा-या कुंटनखान्यावर धाड

धाब्यावर चालणा-या कुंटनखान्यावर धाड

एकमत ऑनलाईन

कळमनुरी : हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर पार्डीमोड पाटीजवळ एका ढाब्यावर चालणा-या कुंटनखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकुन 2 वेश्या १ एजंट व इतर ५ जणांना अटक केली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर पाडीर्मोड पाटीजवळ चंद्रवंशी यांच्या ढाब्यावर कुंटनखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळतात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने दि.२ मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास धाड टाकली असता जवळा बाजार येथील २ वेश्या ह्या धानोरा जहागीर येथील १ एजंट व ढाबा मालक यांच्या संमतीने वेश्या व्यवसाय करताना ३ ग्राहकांसह आढळून आल्याने त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली व त्यांच्या कडुन ५६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर १ जण यात फरार झाला आहे.

दरम्यान कळमनुरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी दिलेल्या फियार्दीवरून कलम ३,४,५ अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक रंजित भोईटे हे करीत आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख,पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, ज्ञानेश्वर मुलगीर, प्रतिभा शेटे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिता धुळे, संभाजी लेकुळे ,विठ्ठल काळे, किशोर सावंत, ज्ञानेश्वर पायघन, जावेद शेख, संदीप जाधव, शिवाजी पवार, कराळे, दांडेकर यांनी केली आहे.

भारताच्या प्रत्येक बंदरावर थर्मल स्कॅनरची उभारणी करणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या