हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात सलग तिन दिवसापासुन पावसाची संततधार सुरु आहे. यातच सिध्देश्वर अन् येलदरी धरणे भरली असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी, नाले आणी ओढ्यांना पुर आला आहे. या पुरात अनेक गावात संपर्क तुटला आहे. तर शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली बुडाल्याने अतोनात नुकसान होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात आज सलग तिस-या दिवशी देखील पावसाचे आगमन झाले. दिवसभर सुर्यदर्शन झाले नसले तरी दुपारनंतर पावसाचा जोर काहिसा ओसरला. जिल्ह्यात दोन दिवसापासुन सुरु असलेल्या पावसाने येलदरी धरण तुडुंब भरले असुन आज सकाळी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आली आहेत यात गेट २,४,७,९ हि ०.५ मिटरने उघडण्यात आली आहेत तर गेट १,३,५,६,८,१० हि १ मिटर उघडण्यात आली असुन नदीपात्रात एकुन ३० हजार १३९.१४ क्यूसेस एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. सिध्देश्वर धरण देखील शंभर टक्के भरले असुन धरणाची पाणी ४१३.०४ दलघमी आहे.
आज सकाळी धरणाची साडे आठ वाजता ८ दरवाजे उघडण्यात आली आहेत. यात गेट क्रमांक २, ४, ६, ७, ८, ९, ११, १३ आदी ०.९ मिटरने उघडण्यात आली आहेत. नदीपात्रात १७ हजार ४७२ क्यूसेसने विसर्ग होत आहे. दरम्यान पाण्याची आवक पाहुन पाण्याचा विसर्ग वाढवणे अथवा कमी करणे याबाबत निर्णय घेणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सोलापूर ग्रामीणमध्ये १७४ कोरोनाबाधित रुग्ण तर शहरात ५३ नवे बाधित