22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeहिंगोलीखा.राजीव सातव यांच्यावर कळमनुरी येथे उद्या शासकीय अंत्यसंस्कार

खा.राजीव सातव यांच्यावर कळमनुरी येथे उद्या शासकीय अंत्यसंस्कार

एकमत ऑनलाईन

हिंगोली : काँग्रेसचे खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांच्यावर कळमनुरी येथील त्याच्या निवासस्थाना समोरील शेतात सोमवारी ता. १७ सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पुर्वी सकाळी सहा वाजल्या पासून त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

मागील २३ दिवसांपासून पुणे येथे कोरोनावर उपचार घेणाऱ्या खासदार सातव यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर त्यांची प्रकृती बरी होऊन ते लवकरच हिंगोली जिल्ह्यात दाखल होतील असा विश्वास हिंगोलीकरांना होता. मात्र नियतीने आपला डाव साधला अन कोरोना नंतर झालेल्या काही गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह आज सकाळी पुणे येथून रुग्णवाहिकेद्वारे कळमनुरीकडे आणला जात आहे.

सायंकाळी उशीरा त्यांचा मृतदेह कळमनुरी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर सोमवारी ता. १७ सकाळी सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे. त्यानंतर दहा वाजता अंत्यसंस्कार केले जातील. खासदार राजू सातव यांचे पार्थिव घेऊन निघालेली रुग्णवाहिका खासदार राजू सातव यांचे पार्थिव घेऊन निघालेली रुग्णवाहिका दरम्यान, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री विश्वजीत कदम, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

या शिवाय शहरी भागा सोबतच ग्रामीण भागातून सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, पत्रकार नंदकिशोर तोष्णीवाल कळमनुरी येथे ठाण मांडून आहेत.

ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणाबाबत मार्गदर्शक सूचना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या