24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home हिंगोली वृक्षाला राखी बांधत केले वृक्षसंवर्धनातून रक्षाबंधन

वृक्षाला राखी बांधत केले वृक्षसंवर्धनातून रक्षाबंधन

एकमत ऑनलाईन

औंढा नागनाथ : नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे केशरिया प्रतिष्ठान चर्चेत असते. अशातच आज पर्यावरण पूरक रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

कोरोनाच्या जैविक संकटामुळे जिल्ह्यात नागरिक घराबाहेर पडण्यासाठी धजावत नाहीत अशा परिस्थितीत रक्षाबंधनाचा सण देखील साध्या पद्धतीने घरात साजरा केला जात आहे. बहिणीकडे जाण्यासाठी बस सेवा सुरु नाही. यामुळे आपल्या लाडक्या बहिणीच्या हातून वळून घेण्यासाठी भावाला बहिणीच्या घरी देखील जाता येत नाही.

यामुळे काहीशी रुखरुख बहिण भावाच्या नात्यात कोरोनामुळे निर्माण झाली आहे असे असले तरी केशरीया प्रतिष्ठान च्या वतीने आज शहरात झाडाला राख्या बांधत बहिणी प्रमाणेच वृक्ष संरक्षणाची शपथ रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी केसरिया प्रतिष्ठानचे महेश खुळखुळे, पाटील, परसराम नागरे, संजय पोले, मुंडे, सूर्यवंशी, बालाजी गांजरे, हनुमंत देशपांडे आदींची उपस्थिती होती. यावेळी झाडांना राखी बांधण्यात आली.

Read More  अयोध्या राममंदिरातील रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात- संभाजी भिडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या