वसमत : वसमत शहरातील कोव्हीड-१९ रुग्णांची संख्या वाढत आहे आणि सदरील रोग नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी वसमत शहरातील कंटेनमेंट भागातील लक्षणे असलेल्या व्यक्ती, वयस्क व्यक्ती यांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता अँटीजन टेस्ट केली जाणार आहे.
शहरातील शुक्रवार पेठ भागाकरिता नागरी आरोग्य केंद्र शुक्रवार पेठ, सम्राट कॉलनी व कारखाणा रोड व त्यांचे जवळील भागाकरिता महात्मा गांधी शाळा सम्राट नगर तसेच गणेश पेठ भागाकरिता जिल्हा परिषद शाळा येथे रॅपिड अँटीजन तपासणी केंद्र कार्यान्वीत करण्यांत येत आहे. ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे आहेत किंवा कंटेनमेंट भागातील जेष्ठ नागरिक ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग आहे आणि गरोदर महिला यांनी प्राधान्याने आपली तपासणी करुन घ्यावी.
कंटेनमेंट भागातील फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, हातगाड्यावर सामान विक्रेते, किरकोळ विक्रेते यांची रॅपिड अँटीजन तपासणी प्राधान्याने करण्यांत येणार आहे. मोहीमेस नगरसेवक, धर्मगुरु, प्रतिष्ठति नागरिक यांनी समाज प्रबोधन करुन जास्तीत जास्त व्यक्तीची तपासणी करावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी यांनी केले आहे.
Read More जॉनी लिव्हर यांचा व्हिडिओ…कोरोना अब पडे गा तुझे रोना…