32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeहिंगोलीआता हिंगोलीतच उतरणार रेशनचा माल!

आता हिंगोलीतच उतरणार रेशनचा माल!

एकमत ऑनलाईन

हिंगोली :  रेशनचा माल साठविण्यासाठी गोडाउन उपलब्ध नसल्यामुळे रेशनचा माल परभणी, नांदेड आणि वाशीम येथे रेल्वेरॅकव्दारे उतरवला जात होता. मात्र आता खुराणा संस्थेव्दारे ८ हजार मेट्रीकटन क्षमतेचे आठ गोडाऊन उपलब्ध झाल्यामुळे रेशनच्या धान्याचे रॅक हिंगोलीत उतरवले जाणार आहेत.

हिंगोली जिल्हा निर्मीती होऊन दोन दशके लोटली तरी जिल्ह्याचा रेशनचा माल नांदेड, परभणी आणि वाशीम येथे उतरवला जात होता. भारतीय खाद्य निगमकडे रेशनचा माल साठवण्यासाठी गोडाऊन नव्हते. यामुळे हिंगोलीत रेशनचा माल उतरवला जात नव्हता. अलिकडे संत नामदेव पतसंस्थेचे ५ हजार मेट्रीक टनचे ५ गोदाम साकारले आहेत. तसेच खुराणा रोडवेज आणि खुराणा उद्योग समुहाचे ३ हजार मेट्रीक टनचे ३ गोडाऊन साकारले आहेत. सदरील गोडाऊन भारतीय खाद्य निगमाला भाडेतत्वावर उपलब्ध झाली आहेत. परिणामी ८ गोदामाच्या माध्यमाने ८ हजार मेट्रीकटन धान्य साठवले जाणार असल्याने भारतीय खाद्य निगमच्या माध्यमाने आता रेशनच्या मालाचे रेल्वेचे रॅक हिंगोलीत उतरले जाणार आहेत. यामुळे आता रेशनचा माल जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर हिंगोलीतुनच पुरवला जाणार आहे.

मागील अनेकवर्षापासून रेशन दुकानदार आणी मजुरांची हिंगोलीचा अन्न धान्याचा माल हिंगोलीतच उतरवला जावा अशी मागणी होती. मात्र परभणी,नांदेड आणि वाशीमच्या मक्तेदारीमुळे भारतीय खाद्य निगम हिंगोलीला पाठवत नव्हते. आता खुराणा उद्योग समुहाच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे. यामुळे रेशन दुकानदारांना लाभदायक ठरणार आहे.

वुई विल डू एव्हरीथींग फॉर हिंगोली -ललीत खुराणा
भारतीय खाद्य निगमच्या माध्यमाने रेशनच्या अन्नधान्याचे रेल्वेच्या माध्यमाने रॅक हिंगोलीतच उतरले जावे यासाठी आठ गोदाम उभारले आहेत. आणखी क्षमता वाढवुन ३० हजार मेट्रीक टन धान्य साठवणारे गोदाम आगामी काळात हिंगोलीचा महसुल वाढविण्याचा पुढाकार घेऊ. स्व. ब्रिजलाल खुराणा यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी परिवहन विभागाला २०० ट्रॅव्हल्सच्या माध्यमाने मोठा महसुल उपलब्ध करुन दिला. जिल्ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची त्यांची शिकवण असल्याने वुई वील डु एव्हरीथिंग फॉर हिंगोली अशी बोलकी प्रतिक्रीया उद्योगपती ललीतराज खुराणा यांनी दिली.

५०० हाताला काम
भारतीय खाद्य निगमच्या माध्यमाने रेशनच्या अन्नधान्याचे रेल्वेच्या माध्यमाने रॅक हिंगोलीतच उतरले जाणार असल्याने हिंगोली रेल्वेस्थानकावर जवळपास ५०० मजुरांना निश्चीत कामाची हमी मिळाली आहे. यामाध्यमाने मालवाहतुकदारांना देखील काम मिळणार आहे. कोरोना जैविक संकटाच्या काळात हे काम फार मोलाचे ठरणार आहे असे मजुराकडुन बोलले जात आहे.

Read More  अवैधरित्या साठवलेला बियरचासाठा जप्त : जिंतूर पोलीसांची कार्यवाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या