22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeहिंगोलीऔषधी विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याची शिफारस

औषधी विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याची शिफारस

एकमत ऑनलाईन

हिंगोली : हिंगोलीत रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या भरारी पथकाने दिवेश मेडीकल या औषधी दुकानाची तपासणी केली असता त्या ठिकाणी इंजेक्शनचा साठा व विक्रीचा ताळमेळ आढळून आला नसल्याने औषध विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याची शिफारस प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी अन्न वऔषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे.

हिंगोली जिल्हयात रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. या पथकामध्ये प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांचा समावेश आहे. या पथकाने शनिवारी ता. २३ जगदंब कोविड हॉस्पीटलची अचानक तपासणी केली. या ठिकाणी ११ रुग्णांच्या फाईल्स तपासण्यात आल्या. त्यामध्ये औषधी दुकानदार दिवेश मेडीकल यांचे चालक तसेच फार्मासीस्ट यांनी रुग्णांना दिलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनच्या पावत्या दिलेल्या नाहीत. तसेच हॉस्पीटलच्या फाईल्स मधेही इंजेक्शनच्या पावत्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा तसेच विक्री केलेल्या इंजेक्शनची संख्या यांचा ताळमेळ कुठेही जुळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यावरून प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी आज परभणी येथील अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये सदर औषध विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनातील नियमानुसार आपल्यास्तरावरून कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्याची शिफारस शनिवारी (दि.२४) केली आहे. दरम्यान औषधी विक्रेत्यांनी इंजेक्शन तसेच इतर औषधीचा ताळमेळ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बार्शीत ऑक्सीजन अभावी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यु, नातेवाईकांचा आरोप

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या