22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeहिंगोलीहिंगोलीतील ऑक्सीजनवरील रूग्णांना दिलासा

हिंगोलीतील ऑक्सीजनवरील रूग्णांना दिलासा

एकमत ऑनलाईन

हिंगोली : येथील शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन तुटवडा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी तातडीने बाहेर राज्यात संपर्क साधून एक ऑक्सिजन टँकर कर्नाटकात मधून उपलब्ध केला आहे. गुरुवारी (दि.२२) सकाळी टँकर उपलब्ध झाल्यामुळे ऑक्स­जिनवरील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. जिल्हयात आजच्या स्थितीत शासकिय रुग्णालयांमधून ३४० रुग्ण ऑक्स­जिनवर आहेत.

या रुग्णांना ऑक्स­जिनचा तुटवडा भासू नये यासाठी हिंगोलीत दोन तर वसमत व कळमनुरी येथेही ऑक्स­जिन टँक उभारण्यात आले आहे. हिंगोलीत सर्वात जास्त ३ केएल ऑक्स­ीजन दररोज लागले तर या ठिकाणी असलेल्या टँकची क्षमता १३ केएलची आहे. मात्र, मागील तीन दिवसांपुर्वी आलेले ऑक्स­जिन आज सकाळपर्यंतच पुरणार आहे. तर कळमनुरी व हिंगोलीतील औंढा रोड भागातील रुग्णालयात दोन दिवस पुरेल एवढाच ऑक्स­जिन साठा आहे.

दरम्यान, हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात सायंकाळपासूनच वैद्यकिय अधिका-यांची धावपळ सुरु झाली होती.. या ठिकाणी चार ड्यूरा सिलेंडर असून ऑक्स­जिन टँक मधील ऑक्स­जिन गुरुवारी सकाळी संपल्यानंतर ड्यूरा सिलेंडरमधून बॅकअप घेण्याची तयारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. स्रेहल नगरे यांनी सुरू केली होती. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी महाराष्ट्रा सोबतच बाहेर राज्यातही ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याबाबत संपर्क साधण्यास सुरुवात केली होती.

सायंकाळी उशिरा कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथुन ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून देण्यास हिरवा कंदील मिळाल्यानंतर या ठिकाणावरून रातोरात टँकर मागवण्यात आले. सकाळी आठ वाजता तीन केएल क्षमतेचे टँकर हिंगोलीत पोहोचल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यामुळे काही प्रमाणात का होईना अक्सिजन वरील रुग्णांना दिलासा मिळाला आहे आता आणखी टँकर मागवण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

परभणीत पाचशे खाटांचे जम्बो कोविड सेंटर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या