28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeहिंगोलीधक्कादायक : हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे 8 रुग्ण वाढले

धक्कादायक : हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे 8 रुग्ण वाढले

एकमत ऑनलाईन

सावधान, काळजी घ्या : आकडे वाढत आहेत; काळजी घ्या, मास्क वापरा, सोशलडिस्टन्स पाळा, घरातून बाहेर पडू नका

हिंगोली  : हिंगोली जिह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील 8 जणांचा कोरोना चाचणी अहवाल आज सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व रुग्ण त्यांच्या गावाकडे मुंबई, पुणे व रायगड येथुन परत आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या 159 झाली असून त्यापैकी 90 व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. तर 69 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Read More  दिग्गज हॉकीपटू बलबीर सिंह सीनियर यांचे निधन

हिंगोली शहरासह जिल्ह्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद व अन्य मोठ्या शहरामध्ये कामानिमित्त असलेले नागरिक गावाकडे परतत आहेत. कळमनुरी तालुक्यात महिनाभरापूर्वी एक रुग्ण आढळुन आल्यावर रुग्ण वाढले नव्हते. दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील मुंबईहून 4, रायगडहून आलेले 3 व पुण्यातुन आलेला एक अशा 8 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. औरंगाबादला उपचार सुरू असलेल्या एका एसआरपीएफ जवानाला बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या औरंगाबादला एक तर हिंगोली जिल्ह्यात 68 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या