वसमत येथील विश्व हिन्दु परिषद संचलित साधु महाराज मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृह येथील माजी विद्यार्थी विजय मुकुंदा सूर्यवंशी हा शेतमजुराचा मुलगा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत एम बी बी एस प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण झाला असून केईएम मुंबई या वैद्यकीय महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला आहे. अत्यंत गरिब परिस्थिती असून सुद्धा या विद्यार्थ्याने विशेष परिश्रम घेऊनश मिळविल्याबद्दल त्याचा सत्कार साधु महाराज विद्यार्थी वस्तीगृह येथे पार पडला.
कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघ चालक डॉ.निलेश दिग्रसे, डॉ. गजानन पतंगे ,डॉ. रेणुका गजानन पतंगे, रामलाल बगळे, दिलीप माळवतकर, दत्ता लिंबाळकर,वस्तीगृह अधीक्षक शिवाजी दुधाने, राजेश भालेराव, सुरेश मोरे, आनंद डरंगे ,वैजनाथ वाघ, रामा वाघ आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. वसतिगृहातून शिक्षण घेऊन विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. पोलिस, सैनिक, डॉक्टर,शिक्षक, बँकिंग क्षेत्र, रेल्वे, सीमा रक्षक,डॉक्टर,सामाजिक, राजकीय क्षेत्र, महसूल विभाग आदी क्षेत्रात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी नावलौकिक गाजविला आहे.
वस्तीगृहात विद्यार्थी वर्ग पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतात. आपल्या आवडीनूसार करिअर निवडून यशस्वी होण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करावे यासाठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते. वस्तीगृहाचे संचालक मंडळ व अधीक्षक कर्मचारी वर्ग, शुक्रवार पेठ येथील नागरिक महिला विद्यार्थी सत्कार समारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमलून येणारा सुगंधित ‘शब्दगंध’