32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeहिंगोलीएसटीच्या चालकांची मालवाहतुकीसाठी होतेय पिळवणुक

एसटीच्या चालकांची मालवाहतुकीसाठी होतेय पिळवणुक

एकमत ऑनलाईन

मकरंद बांगर हिंगोली : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद चालणा-या एसटी महामंडळ कोरोनाच्या जैवीक संकटाने डबघाईस आले आहे. परिणामी अर्थिक संकटातुन वाट काढण्यासाठी एसटीतुन मालवाहतुकीचा प्रयोग साकारला मात्र केवळ प्रवासी वाहतुक करीत डबघाईस आलेल्या वाहनातुन माल वाहतुक अडचणीची ठरत आहे. यातच रिकाम्या हाताने परतु नका असा आदेश दिला जात असल्याने माल वाहतुकीचा अनुभवच नसल्याने चालकांची गोची होत आहे. परिणामी ंिहगोली आगारात आठ दिवसापासुन सोळा चालक भाड्याच्या प्रतिक्षेत तळ ठोकुन आहेत.

एसटी महामंडळ डबघाईस आले असतांना सामुहिक प्रयत्नातुन मार्ग काढणे गरजेच आहे. उत्पन्नाचे शोधतांना मालवाहू वाहतूक करणाचा पर्याय समोर आला. अर्थात पर्याय योग्य असलातरी एसटीने मर्यादा ओळखणे गरजेचे आहे. कारण बहुतांश बस मोडकळीस आलेल्या आहेत. शिवाय मालवाहतुकीसाठी बस तांत्रीक दृट्या सक्षम नाहीत. प्रवासी नादुरुस्त झाली तर अन्य आगाराच्या बस मध्ये प्रवाशांना पाठवता येते. यामुळे चालक आणी वाहक निश्चींत होतात.

मालवाहतुक करतांना असे जमत नाही. अशावेळी बस नादुरुस्त झाल्यास चालकांना तिथेच थांबावे लागत आहे. अशातच रिकाम्या हाताने परतु नका असा आदेश काढुन चालकांचा छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून १६ मालवाहू वाहतूक करणारे चालक जिल्ह्यात अडकून पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकाची परिस्थिती घर कब आओगे ट्रकच्या मागे लिहिलेल्या स्लोगन प्रमाणे झाली आहे. आठ दिवसापासून अडकलेल्या १६ चालकांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

माल वाहतुकीचा अनुभवच नाही- राऊत
एसटी महामंडळाकडून प्रवाशी वाहतुक केली जाते. मागील अनेक वर्षापासून हिच सेवा देत आहोत. मालवाहतुकीचा अनुभवच नाही. आठ दिवसापासून परळीहुन विट घेऊन हिंगोलीला आलो. अजुन परतीचे भाडे मिळाले नाही. आगाराकडून कुठलीही राहण्याची व्यवस्था न केल्यामुळे संसारच एसटीबस मध्ये थाटावा लागत आहे. तर पिण्याच्या पाण्याची आणि जेवणाची देखील व्यवस्था नसल्याची कबुली माजलगाव आगाराचे चालक जी.एन.राऊत यांनी सांगितले.

नियोजनच नाही- जाधव
एसटी महामंडळाने माल वाहतुकीचे नियोजन करायला हवे. परंतु असे होत नाही. चालकांला दुहेरी भाडे मिळेल तर एकेरी दर आकारणे गरजेचे आहे. कारण चालकाला गावात फिरुन भाडे आणता येत नाही आणी तसा अनुभव देखील नाही. यामुळे आधी दोन्ही बाजुच्या भाड्याचे नियोजन करणे गरजेचे आहे असे मत परळी आगाराचे चालक अशोक जाधव यांनी मांडले.

१८ तास सैन्य दलाचं ऑपरेशन : ७ दहशतवाद्यांचा खात्मा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या