34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeहिंगोलीलॉक डाउनची कळमनुरीत कडक अमल बजावणी

लॉक डाउनची कळमनुरीत कडक अमल बजावणी

एकमत ऑनलाईन

कळमनुरी : आज पासून 7 दिवसाचा लॉकडाऊन जिल्हाभरात लागला असताना कळमनुरी येथे सुद्धा कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रशासनासह, नागरीक व व्यापाऱ्यांकडून दिसून आली. जिल्ह्यात 1 मार्च ते 7 मार्च पर्यंत संपूर्ण लॉक डाऊन लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले असता अनेक स्तरावरन विरोध उमटू लागला होता व लॉक डाउन बाबत फेर विचारची मागणी करण्यात आली होती तरी पण शासनाचे लॉकडाऊनच्या आदेशाची शहरात पूर्णतः अंमलबजावणी होताना दिसून आली शहरातील मेडिकल, दवाखाने, व दुध डेअरी वगळता सर्व प्रतिष्ठान बंद होती तसेच रस्ते ही निर्मनुष्य दिसून आले शासकीय कार्यालय ,बँक मध्ये अधिकारी कर्मचारी ची तुरळक उपस्थिती होती लॉकडाऊन दरम्यान कायदा व कोरोना नियम पालन नागरीकांनी करावे यासाठी पोलीस कर्तव्य पार पाडताना गस्त घालतांना दिसत होते.

आरोग्य विभाग कडून बस स्थानक कळमनुरी येथे रॅपिड अँटीजेन मोहिमेस सुरुवात करीत
बाहेर गावाहून कळमनुरी शहरात येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड अँटीजेन तपासणी करून च त्यांची तपासणी नकारात्मक असल्यावरच त्यांना कळमनुरी शहरात प्रवेश देण्यात येत होता तर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली आज पहिल्या दिवशी माजी मंत्री रजनी ताई सातव यांनी लस घेतली व त्यांना तहसीलदार मयूर खेंगले यांच्या हस्ते प्रमाण पत्र देण्यात आले. तर नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे यांनी ही लसीकरण करून घेतले या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ आनंद मेने , डॉ महेश पंचलीगे, सोफिया खान, आदींची उपस्थिती होती.

कळमनुरी तालुक्याला संचारबंदी तून वगळण्यात यावे; तालुका मराठी पत्रकार संघाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
कळमनुरी कोरोना कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यात एक मार्च ते 7 मार्च पर्यंत पूर्ण संचारबंदी लागू केली आहे परंतु कळमनुरी तालुक्यात कोरोना चा जास्त प्रादुर्भाव नसताना सुद्धा कळमनुरी तालुक्यात संचारबंदी लावण्यात आली आहे यामुळे ज्या तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव आहे त्यास तालुक्यात संचारबंदी लागू करावी कमी प्रादुर्भाव असलेल्या कळमनुरी तालुक्याला संचारबंदी तून वगळण्यात यावे अशी मागणी कळमनुरी तालुका मराठी पत्रकार संघाने एका लेखी निवेदनाद्वारे कळमनुरीचे तहसीलदार मयुर खेंगले यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

फेब्रुवारी महिन्यात कळमनुरीत कोव्हीड सेंटरमध्ये 482 आर.टी. पी.सी.आर व अंतिजन रॅपिड टेस्ट 178 अशा एकूण 660 कोरोना टेस्ट घेण्यात आल्या यामध्ये एका महिन्यात फक्त 24 जण पॉझिटिव्ह आले तसेच आज रोजी कळमनुरी कोव्हीड सेंटर मध्ये 17 कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण आहे यामुळे कळमनुरी तालुक्यात कोरूना बाधित रुग्णांची संख्या कमी असल्याने व जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात दिनांक 1 मार्च ते 7 मार्च पर्यंत संचार बंदीची घोषणा केली आहे. कळमनुरी तालुक्यात मोठे उद्योग धंदे नसल्याने बहुतेक नागरिक छोटे-मोठे उद्योग व्यवसाय व रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात संचारबंदी लागल्यानंतर हातावरचे पोट असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे तरी जिल्हाधिकाऱ्यांनी कळमनुरी तालुक्याला संचारबंदी तून वगळण्यात यावे मार्च व सोशल डिस्टंसिंग ची सक्ती करावी कळमनुरी तालुक्याला या संचारबंदी तून वगळण्यात यावे अशी लेखी मागणी एका निवेदनाद्वारे कळमनुरीचे तहसीलदार मयुर खेंगले यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे कळमनुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अलिमोद्दिन कादरी यांनी केली आहे.

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चॅटींग ; शिक्षकाविरुध्द गुन्हा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या