27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeहिंगोलीअदिवासी विद्यार्थिनीची आत्महत्या; मुख्याध्यापक व महिला वार्डनवर गुन्हा

अदिवासी विद्यार्थिनीची आत्महत्या; मुख्याध्यापक व महिला वार्डनवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

आखाडा बाळापूर : बोथी येथील शासकीय अदिवासी निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी कु. शिवानीच्या आत्महत्या प्रकरणात शाळेतील मुख्याध्यापक खांडरे व महिला वार्डन विनकरे या दोघांच्या विरोधात आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आखाडा बाळापूर पोलीस स्थानक अंतर्गत असलेल्या व आखाडा बाळापूर येथून जवळच असलेल्या बोथी येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रम शाळेत दिनांक २१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता इयत्ता दहावी वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कु. शिवानी सदाशिव वावधणे वय १६ वर्ष हिने आपल्या खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात मयत शिवानी चे वडील सदाशिव नागोराव वावधने वय ३५ वर्ष रा.वारंगाफाटा यांनी रोष व्यक्त करून आपल्या मुलीला त्रास देणाऱ्या मुख्याध्यापक व महिला वार्डन यांच्या विरोधात आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली.

आरोपी मुख्याध्यापक खांडरे व महिला वार्डन विनकरे या दोघांनी वरील तारीख वेळी व ठिकाणी आरोपीतांनी संगनमत करून फिर्यादीची मुलगी आदिवासी जातीची आहे ही माहीत असताना शासकीय निवासी आश्रम शाळा बोथी ता. कळमनुरी येथे त्यांच्यात असताना त्यांनी त्रास दिला त्या त्यांचे त्रासाला कंटाळून तिने आश्रम शाळेतील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली म्हणून दोघांच्या विरोधात गुन्हा क्र. व कलम २८४/ २०२२कलम ३०६ ,३४ भा. दं.वि.कलम ३(२)(५)(अ)अ.जा.अ.जा.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे वसमत व पोलीस निरीक्षक निकाळजे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोन्डले,पोलीस उपनिरीक्षक माजीद यांनी भेट दिली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे वसमत हे करीत आहेत. दरम्यान मयत मुलीची उत्तरणीय तपासणी हिंगोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याणकर, डॉ. जाधव यांनी केले. शोकाकुल वातावरणात मयत कु. शिवानीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या